Raha Kapoor And Abhishek Bachchhan: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनची सर्वत्र चर्चा रंगली होती. जामनगर येथे १ ते ३ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळपास बॉलिवूडमधील सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टची मुलगी राहाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर राहाला घेऊन येत असतो. प्री-वेडिंगच्या अखेरच्या दिवशी अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच रणबीर-आलियाची लेक राहाशी संवाद साधला. बच्चन कुटुंबीय जामनगरच्या कार्यक्रमात शेवटच्या दिवशी सहभागी झाले होते. यावेळी राहा दिसताच अभिषेकने तिला हॅलो केले. परंतु, ओळख नसल्याने राहा लगेच रणबीरला बिलगल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिषेक आणि राहाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: आलियाच्या कडेवरील राहाला पाहताच अनंत अंबानी झाला खूश, पाहा व्हिडीओ
यापूर्वी राहाचा अनंत अंबानीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आलिया लेक राहाला कडेवर घेऊन फिरताना दिसत होती. अशात राहाला समोर पाहाताच अनंत अंबानी आनंदी होतो आणि ज्यूनियर कपूरवर प्रेमाचा वर्षाव करतो. राहा मात्र, त्याच्याकडे पाहण्यासही नकार देते. ओळख नसल्यामुळे राहा अनंतकडे देखील पाहात नाही.
वाचा: 'अच्छा तो हम चलते हैं...', धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची लेक राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. आलियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. इतके दिवस आलियाने राहाचा चेहरा फोटोग्राफर्सपासून लपवला होता. डिसेंबर महिन्यात रणबीरने सर्वांसमोर राहाला आणले. तिचा फोटो पाहून अनेकांना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आठवण आली. आता अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंकशनमधील फोटो पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
संबंधित बातम्या