Viral Video: ‘हनुमान’ चित्रपटाच्या पोस्टरसोबत पोज देण्यापूर्वी अभिनेत्याने काढली चप्पल! नेटकऱ्यांनी केलं कौतुक-rana daggubati viral video rana took off his shoes while posing with hanuman movie poster ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: ‘हनुमान’ चित्रपटाच्या पोस्टरसोबत पोज देण्यापूर्वी अभिनेत्याने काढली चप्पल! नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Viral Video: ‘हनुमान’ चित्रपटाच्या पोस्टरसोबत पोज देण्यापूर्वी अभिनेत्याने काढली चप्पल! नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Jan 17, 2024 02:57 PM IST

Rana Daggubati Viral Video: या व्हिडीओमध्ये साऊथचा प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबाती ‘हनुमान’ चित्रपटाच्या पोस्टरसोबत पोज देताना दिसला आहे.

Rana Daggubati Viral Video
Rana Daggubati Viral Video

Rana Daggubati Viral Video: सध्या बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान’ या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात अभिनेता तेजा सज्जा मुख्य भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. दरम्यान आता या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साऊथचा प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबाती ‘हनुमान’ चित्रपटाच्या पोस्टरसोबत पोज देताना दिसला आहे. मात्र, यावेळी राणा दग्गुबातीने जे केलं, ते पाहून सगळेच चाहते त्याचं तोंडभरून कौतुक करू लागले आहेत.

‘हनुमान’ या चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर भरपूर यश मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला साऊथच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी ‘बाहुबली’ अभिनेता राणा दग्गुबाती देखील हजर होता. राणासोबतया कार्यक्रमाला चित्रपटाचा अभिनेता तेजा सज्जा आणि दिग्दर्शक प्रशांत वर्माही उपस्थित होते. या दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये, राणा दग्गुबाती याला काही मध्यमकर्मी चित्रपटाच्या पोस्टरसोबत फोटोसाठी पोज देण्याचा आग्रह करत होते. तर, राणा देखील सगळ्यांचा मान राखून पोस्टर समोर गेला. मात्र, पोस्टरवर भगवान हनुमानाची प्रतिमा पाहून राणाने पायातील बूट काढले आणि मगच तो पोस्टरजवळ गेला.

Tharala Tar Mag 17th Jan: अर्जुनच्या हाती पक्के पुरावे! आश्रमाच्या केसमधून मधुभाऊ सुखरूप सुटणार का?

‘हनुमान’ या नावाप्रमाणेच या चित्रपटाच्या पोस्टरवर भगवान हनुमानाचा फोटो देखील आहे. अगदी आपण एखाद्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी ज्याप्रकारे चपला आणि बूट बाहेर काढून ठेवतो, त्याचप्रमाणे राणा दग्गुबाती याने भगवान हनुमानाच्या प्रतिमेसमोर जाताना आपल्या पायातील बूट काढून ठेवले. यानंतर त्याने पोस्टर समोर जाऊन फोटो काढला. यावेळी पोडीयमवर गदा देखील ठेवण्यात आली होती. या गदेसोबत देखील राणाने फोटो काढले. राणाच्या याच कृतीचं आता नेटकरी कौतुक करत आहेत.

राणा दग्गुबातीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते या व्हिडीओवर कमेंट्स अन् कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ‘हाच खरा हिंदू आहे, हेच खरे संस्कार आहेत.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘यामुळेच बॉलिवूडपेक्षा साऊथच्या कलाकारांना अधिक सन्मान मिळतो.’ आणखी एका व्यक्तीने कमेंट करत लिहिले की, ‘साऊथ आणि बॉलिवूडमध्ये हाच फरक आहे.’

Whats_app_banner
विभाग