Rana Daggubati Touches SRK Feet:‘आयफा अवॉर्ड्स २०२४’ची पत्रकार परिषद गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘बॉलिवूड किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खान यानेही हजेरी लावली होती. शाहरुख व्यतिरिक्त या कार्यक्रमात करण जोहर,राणा दग्गुबाती,सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिषेक बॅनर्जी देखील उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम खूप मजेशीर होता. शाहरुख आणि करणने या मंचावर एकत्र खूप धमाल केली. यानंतर, त्यांनी राणा दग्गुबाती याल स्टेजवर बोलावले. जेव्हा राणा या स्टेजवर आला, तेव्हा तो शाहरुख खानच्या पाया पडला. यावर शाहरुख खानने दिलेली प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे.
आयफा २०२४च्या मंचावर येताच आधी सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिषेक बॅनर्जी स्टेजच्या पायऱ्यांना स्पर्श करतात. त्यानंतर राणा,शाहरुख आणि करण यांच्या पायांना स्पर्श करत, पाया पडतो. यादरम्यान तो म्हणतो की, आम्ही दक्षिण भारतीय आहोत. आणि ही आमची संस्कृती आहे. राणाने थेट पाया पडताच सुरुवातीला शाहरुख खान थोडा गोंधळून जातो. त्याला आश्चर्य वाटते आणि नंतर तो राणाला प्रेमाने मिठी मारतो. त्यांच्या या व्हिडीओ सध्या सगळ्यांचे मन जिंकून घेतले आहे. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते देखील भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
यावेळी शाहरुख खानने'स्त्री २'मधील अभिनयाबद्दल अभिषेक बॅनर्जीचे कौतुक केले आहे. तुझा चित्रपट पाहिल्यानंतर, आता तुला लाईव्ह बघून खूप छान वाटत आहे, असे तो म्हणतो. इतकंच नाही तर, ‘मी तुला फोन करणार होतो’ असे देखील शाहरुख अभिषेकला म्हणाला.
शाहरुखला या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यातील कामगिरीबद्दल विचारले असता,त्याने सांगितले की,शाहिद कपूर,विकी कौशल,जान्हवी कपूर,क्रिती सेनन हे हा कार्यक्रम सादर करतील आणि दिग्गज अभिनेत्री रेखा देखील या कार्यक्रमाला येणार आहेत.
शाहरुखने या वेळी असेही सांगितले की,मला आयफा अवॉर्ड्समध्ये भाग घेण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. परंतु, कामाच्या बांधिलकीमुळे ते नेहमीच शक्य होत नाही. आयफा मोठा आहे आणि आता मल्याळम,तामिळ,कन्नड,तेलुगू आणि हिंदी चित्रपटांच्या जोडीने तो आणखी मोठा झाला आहे. आयफाअवॉर्ड्स २०२४, हा सोहळा२७सप्टेंबर ते २९सप्टेंबर या कालावधीत अबु धाबीच्या यास बेटावर होणार आहे.