Ramesh Sippy : २३ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीवर जडला 'शोले'च्या दिग्दर्शकाचा जीव! वाचा रमेश सिप्पी यांची लव्हस्टोरी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ramesh Sippy : २३ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीवर जडला 'शोले'च्या दिग्दर्शकाचा जीव! वाचा रमेश सिप्पी यांची लव्हस्टोरी

Ramesh Sippy : २३ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीवर जडला 'शोले'च्या दिग्दर्शकाचा जीव! वाचा रमेश सिप्पी यांची लव्हस्टोरी

Jan 23, 2025 09:24 AM IST

Happy Birthday Ramesh Sippy : लोकांच्या प्रेमाच्या कहाण्या लिहिणारे रमेश स्वतः टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री किरण जुनेजाच्या प्रेमात पडले होते.

२३ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीवर जडला 'शोले'च्या दिग्दर्शकाचा जीव! वाचा रमेश सिप्पी यांची लव्हस्टोरी
२३ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्रीवर जडला 'शोले'च्या दिग्दर्शकाचा जीव! वाचा रमेश सिप्पी यांची लव्हस्टोरी

Ramesh Sippy Birthday : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत, जे तुम्ही कल्ट सिनेमा म्हणून पाहू शकता. यापैकी एक म्हणजे 'शोले', अमिताभ बच्चन-जया भादुरी, धर्मेंद्र-हेमा मालिनी स्टारर हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली होती. हा चित्रपट त्याच्या गाण्यांपासून ते त्याच्या कथेपर्यंत लोकांना अजूनही आठवतो. आजही शोलेच्या काही सीन्ससाठी लोक दिवाने आहेत. आजही या चित्रपटाचे संवाद लोकांच्या ओठावर आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी होते, ज्यांचे स्वतःचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. आज त्यांच्या वाढदिवस असून, यानिमित्ताने त्यांची प्रेमकथा कशी होती, हे जाणून घेऊया.

तीन कोटींमध्ये बनला होता 'शोले'!

रमेश सिप्पी यांचे वडील जीपी सिप्पी हे देखील चित्रपट निर्माते होते. रमेश यांनी वयाच्या ९व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर काम केले. १९५३मध्ये वडिलांच्या 'शहेनशाह' चित्रपटात ते बालकलाकार म्हणून दिसले होते. रमेश यांनी दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून काम केले असून, दोन्ही क्षेत्रात ते यशस्वी झाले आहेत. १९७१ मध्ये 'अंदाज' चित्रपटातून दिग्दर्शक होण्यापूर्वी त्यांनी सुमारे ७ वर्षे सहाय्यक म्हणून काम केले.

जेव्हा रमेश सिप्पी यांना 'शोले'ची कल्पना आली, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणजेच बजेटची समस्या होती. आणि म्हणूनच ते आपले वडील जीपी सिप्पी यांच्याकडे गेले आणि त्यांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी आपल्या मनातील चित्रपट बनवण्याची इच्छाही सांगितली. यानंतर वडिलांच्या मदतीने हा चित्रपट तीन कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला.

लोकांच्या प्रेमाच्या कहाण्या लिहिणारे रमेश स्वतः टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री किरण जुनेजाच्या प्रेमात पडले होते.

रमेश सिप्पी पडले टीव्ही अभिनेत्रीच्या प्रेमात!

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण लोकांच्या प्रेमाच्या कहाण्या लिहिणारे रमेश स्वतः टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री किरण जुनेजाच्या प्रेमात पडले होते. 'महाभारत'मध्ये 'गंगा'ची भूमिका करून किरणने लोकप्रियता मिळवली, तर रमेश सिप्पी 'शोले'सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाले. अशा परिस्थितीत दोघेही पहिल्यांदाच एका फिल्म पार्टीदरम्यान भेटले आणि येथूनच त्यांच्या प्रेमाला बहर आला.

एकीकडे किरण अविवाहित होती तर दुसरीकडे रमेश वैवाहिक जीवनात रमलेले होते. पण, असे म्हणतात ना की प्रेमाला वय किंवा धर्म दिसत नाही आणि रमेश यांच्यासोबतही असेच काहीसे घडले. आधीच विवाहित असलेल्या रमेश यांनी आपल्यापेक्षा तब्बल २३ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री किरण यांच्या प्रेमात पडण्याचं धाडस केलं. त्यांनी चार वर्षे एकमेकांना डेट केलं आणि १९८६मध्ये दोघांनी लग्न केलं.

Whats_app_banner