मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ramayana: भूमिकेसाठी काहीपण! ‘रामायणा’तील ‘हनुमाना’च्या पात्रासाठी तब्बल ९ तास उपाशी राहायचे दारा सिंह

Ramayana: भूमिकेसाठी काहीपण! ‘रामायणा’तील ‘हनुमाना’च्या पात्रासाठी तब्बल ९ तास उपाशी राहायचे दारा सिंह

Jan 20, 2024 03:11 PM IST

Ramayana Hanuman Fame Dara Singh: ‘हनुमान’ साकारणारे अभिनेते दारा सिंह प्रत्येक एपिसोडच्या शूटिंगदरम्यान तब्बल ९ तास काहीही न खाता उपाशी राहायचे.

Dara Singh
Dara Singh

Ramayana Hanuman Fame Dara Singh: गेल्या २०-३० वर्षांमध्ये छोट्या पडद्यावर अन् मोठ्या पडद्यावर अनेक ‘रामायणं’ झाली. मात्र, आजही प्रेक्षकांच्या मनातील रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेची जागा आजवर कुणीही घेऊ शकलेलं नाही. या मालिकेला प्रदर्शित होऊन २५ वर्षांहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. मात्र, आजही या मालिकेवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. या मालिकेतील कलाकारांना चाहते खऱ्या आयुष्यात देखील देवाप्रमाणेच मानतात. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अभिनेते दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. या पत्रासाठी ते अक्षरशः उपाशी राहायचे.

ट्रेंडिंग न्यूज

दिग्दर्शक-निर्माते रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत ८०च्या दशकामध्ये हा शो कसा बनवला गेला, प्रत्येकाने किती मेहनत घेतली हे सांगितले आहे. या मालिकेसाठी ‘हनुमान’ साकारणारे अभिनेते दारा सिंह प्रत्येक एपिसोडच्या शूटिंगदरम्यान तब्बल ९ तास काहीही न खाता उपाशी राहायचे, याची आठवण देखील त्यांनी यावेळी शेअर केली. या मालिकेसाठी त्यांचे वडील हणजेच रामानंद सागर कसे झपाटल्यासारखे काम करायचे, हे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची संघर्षकथा मोठ्या पडद्यावर झळकणार! अभिनेत्याचा लूक बघाच

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेम सागर यांनी अभिनेते दारा सिंह यांच्याबद्दल सांगताना म्हटले की, 'हनुमानाच्या भूमिकेसाठी दारा सिंह यांच्या मेकअपला तब्बल ३-४ तास लागायचे. त्या वेळी कोणतेही प्रोस्थेटिक्स मेकअप प्रकार नव्हते. आम्हाला हनुमानजींचा मेकअप करून नंतर त्यांची शेपटी देखील जोडायला लागायची. आता शेपूट लावली तर बसणार कसं? अशावेळी त्यांच्यासाठी एक खास स्टूल बनवून घेण्यात आला होता. या स्टूलमध्ये एक कट होता, जेणेकरून ते शेपूट वर करून बसू शकतील. चेहऱ्यावर मेकअप असताना ते जेवणार तरी कसे? शूटच्या किमान ३ तास आधी त्यांना मेकअप केला जायचा. अशावेळी पुढील ५-६ तास सीन करेपर्यंत दारा सिंह काहीही खात-पीत नसायचे. इतके त्या या भूमिकेशी समरसून गेले होते.’

आपल्या वडिलांची आठवण सांगताना प्रेम सागर पुढे म्हणाले की, 'पापाजी तर अक्षरशः वेड्यासारखे वागायचे. रात्री त्यांच्या मनात सीन यायचा आणि ते रातोरात संवाद बदलून टाकायचे. त्याचवेळी ते सगळ्यांना उठवायला सांगायचे. सकाळी ४ वाजल्यापासून या मालिकेच्या शूटिंगची सुरुवात व्हायची. त्यावेळी सगळ्यात जास्त अडथळे वानरसेना तयार करताना यायचे. ५०० लोकांना तयार करण्यासाठी आम्हाला सगळ्यात जास्त वेळ लागायचा.’

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग