Ramayan Movie Sai Pallavi Out: फिल्ममेकर नितेश तिवारीचा आगामी चित्रपट ‘रामायण’ पुन्हा एकदा त्यातील कलाकारांमुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर ‘राम’, यश ‘रावणा’ची भूमिका, विजय सेतुपती ‘विभीषण’ आणि सनी देओल ‘हनुमाना’ची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा यापूर्वीच रंगू लागल्या होत्या. तर, आतापर्यंत या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीचे नाव घेतले जात होते. मात्र, साई पल्लवीने देखील या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे म्हटले जात आहे. आय अभिनेत्री जान्हवी कपूर ‘सीते’ची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नितेश तिवारी यांच्या ‘बवाल’ या चित्रपटात काम केले आहे.
दुसरीकडे, अभिनेता रणबीर कपूर ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगची तयारी करत आहे. या चित्रपटात तो भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. हनुमानाच्या भूमिकेबद्दल सर्वाधिक उत्सुकता आहे. या भूमिकेत सनी देओल झळकणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता सीतेच्या भूमिकेबद्दल देखील एक नवीन अपडेट समोर आले आहे. यापूर्वी ही भूमिका अभिनेत्री साई पल्लवी करत होती. मात्र, आता मीडिया रिपोर्टनुसार, ही भूमिका जान्हवी कपूरला देण्यात आली आहे. जान्हवीने नितेश तिवारीसोबत ‘बवाल’ या चित्रपटात काम केले आहे. तर, आता नितेश तिवारीला देखील सीतेच्या भूमिकेसाठी जान्हवी योग्य असल्याचे वाटत आहे.
नितेश तिवारीचा ‘रामायण’ हा चित्रपट ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या रिलीजनंतरपासून चर्चेत आहे. या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, रणबीर कपूरने चित्रपटातील भूमिकेसाठी अर्थात भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी दारू आणि मांसाहार देखील सोडला आहे. रणबीरने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, मुलगी राहाच्या जन्मानंतर त्याने अतिशय निरोगी जीवनशैली स्वीकारली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘रामायण’ चित्रपटाचे दिग्दर्शक नितीश तिवारी यांनी 'रामायण' चित्रपटातील राजा दशरथच्या भूमिकेसाठी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत राम अर्थात अभिनेते अरुण गोविल यांच्याशी संपर्क साधला आहे. आता ‘रामायण’ या चित्रपटात राजा दशरथाची भूमिका साकारण्यास अरुण गोविल यांनी होकार दिल्याचे समोर आले आहे. सध्या अरुण गोविल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत.
संबंधित बातम्या