Ramayan: 'रामायण' मालिकेत भूमिका साकारणारे असलम खान सध्या काय करतात?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ramayan: 'रामायण' मालिकेत भूमिका साकारणारे असलम खान सध्या काय करतात?

Ramayan: 'रामायण' मालिकेत भूमिका साकारणारे असलम खान सध्या काय करतात?

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Apr 18, 2023 12:35 PM IST

Aslam khan: असलम खान यांनी रामायण मालिकेत ११ भूमिका साकारल्या आहेत. २००२मध्ये त्यांनी लाइमलाइटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आज ते काय करतात जाणून घेऊया...

Aslam khan
Aslam khan

प्रेक्षकांच्या मागणीनुसार रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा दूरदर्शन वाहिनीवर सुरु करण्यात आली. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मालिकेतील प्रभू रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, लक्ष्मणाची भूमिका साकारणे सुनील लहरी, सीतेच्या भूमिकेतील दीपिका अशी अनेक पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली. पण तुम्हाला माहिती आहे का एकाच अभिनेत्याने रामायण या मालिकेत चार पाच भूमिका साकारल्या होत्या.

रामानंद सागर यांच्या रामायणात एक अभिनेता असा आहे ज्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. या अभिनेत्याने कधी ऋषींची भूमिका साकारली आहे तर कधी सेनापती. अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या या मुस्लीम कलाकाराचे नाव असलम खान आहे. आज असलम खान काय करतात जाणून घेऊया...
वाचा: जेठालाल दुसऱ्या क्रमांकावर, लोकप्रियतेत कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर? जाणून घ्या

असलम खान यांनी रामायण मालिकेत ११ भूमिका साकारल्या आहेत. २००२मध्ये त्यांनी लाइमलाइटपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी स्वत: बिझनेस सुरु केला. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार ते सध्या एका मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत आहेत.

असलम यांनी छोट्या पडद्यावरील अलिफ लैला, श्री कृष्ण, सूर्यपुत्र कर्ण, मशाल आणि हवाए या मालिकांमध्ये काम केले. तसेच रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. या मालिकेत त्यांनी ११ भूमिका साकारल्या.

Whats_app_banner