मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Arun Govil : राम साकारून सन्मान मिळाला पण…; ‘रामा’च्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल

Arun Govil : राम साकारून सन्मान मिळाला पण…; ‘रामा’च्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 20, 2024 10:01 AM IST

Arun Govil Talks About His Ramayana Role: ‘रामा’ची भूमिका साकारून अभिनेते अरुण गोविल यांना खूप मानसन्मान मिळाला. पण, याचा फायदा त्यांना चित्रपटांमध्ये मिळाला नाही.

Arun Govil
Arun Govil

Arun Govil Talks About His Ramayana Role: दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या शोमधून प्रत्येक घराघरात भगवान राम म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता अरुण गोविल यांना आजही अनेक चाहते देव मानतात. या शोने अरुण गोविल यांना प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख मिळवून दिली होती. इतकंच नाही तर, यानंतर टीव्हीवर अनेक मालिका आल्या, रामायणावर आधारित अनेक चित्रपट तयार झाले. पण, जेव्हाही प्रभू रामाच्या व्यक्तिरेखेचा विचार केला जातो, तेव्हा अरुण गोविल यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. या शोनंतर अभिनेते अरुण गोविल यांना खूप मानसन्मान मिळाला. पण, याचा फायदा त्यांना चित्रपटांमध्ये मिळाला नाही.

अभिनेते अरुण गोविल यांना चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळत नव्हती, कारण त्यांना प्रेक्षकांनी नेहमीच ‘भगवान राम’ म्हणून पाहिले. त्यांनी केवळ अशाच भूमिका साकाराव्यात, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. अरुणने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, रामायणामुळे त्यांच्या आयुष्यात काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी घडल्या. अरुण गोविल म्हणाले की, 'या भूमिकेमुळे मला खूप सन्मान मिळाला. पण, त्यामुळे मला व्यावसायिक चित्रपट मिळत नव्हते. सर्व निर्माते-दिग्दर्शक मला सांगायचे की, माझी प्रभू रामाची प्रतिमा इतकी मजबूत आहे की, मला इतर कोणती भूमिका द्यायची तेच त्यांना समजत नाही. लोकांना तुमच्यात फक्त रामच दिसतो. त्यांना तुम्हाला इतर कोणत्याही भूमिकेत बघायचे नाही, असे निर्माते म्हणायचे.'

Vijay Deverakonda: रश्मिका मंदानासोबत साखरपुडा करणार? अखेर विजय देवरकोंडा बोललाच! म्हणाला...

तीन वर्षे चाललेल्या ‘रामायण’ मालिकेदरम्यान अरुण गोविल यांना आपल्या प्रतिमेची विशेष काळजी घ्यावी लागली होती. मात्र, या मालिकेनंतर ते ‘श्रीरामा’च्या प्रतिमेतून कधीच बाहेर पडू शकले नाहीत. या भूमिकेने त्यांना जितकी प्रसिद्धी मिळवून दिली, तितकाच मोठा फटका त्यांच्या करिअरला बसला होता. प्रेक्षकांना त्यांना इतर कोणत्याही चित्रपटात रोमान्स करताना किंवा नकारात्मक भूमिकेत बघायचे नव्हते.

‘रामायणा’नंतर अरुण गोविल यांनी ‘मुकाबला’, ‘हथकडी’, ‘दो आँखे १२ हाथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसले होते. यानंतर ते स्टार प्लसवरील एका मालिकेत देखील झळकले होते. गेल्या काही वर्षांत अरुण गोविल यांनी काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे. गेल्या वर्षी ते ‘ज्युबिली’, ‘ओएमजी २’ आणि ‘हुक्स बुक्स’ या चित्रपटांमध्ये दिसले होते. सध्या अरुण गोविल अयोध्येला पोहोचले आहेत. २२ जानेवारीला ते राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत रामायणातील त्याचे सहकलाकार दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी देखील अयोध्येत असणार आहेत.

WhatsApp channel

विभाग