मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ramayan: रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुन्हा पाहायची? मग ही बातमी नक्की वाचा

Ramayan: रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका पुन्हा पाहायची? मग ही बातमी नक्की वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 01, 2024 10:21 AM IST

Ramayan on Tv: लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रामानंद सागर यांची सुपरहिट मालिका 'रामायण' पुन्हा दाखवण्यात आली. आता पुन्हा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ramayan on Tv
Ramayan on Tv

Ramayan on Tv: देशभरात २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला जगभरातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रामायण'मधील प्रभू श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांनी तसेच सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia), लक्ष्मण ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी (Sunil Lahri) यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता 'रामायण' मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही मालिका पुन्हा एकदा घर बसल्या पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठे?

कुठे पाहायला मिळणार मालिका?

'रामायण' ही मालिका पुन्हा एकदा दूरदर्शन म्हणजेच डीडी नॅशनल या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. याबाबत दूरदर्शनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
वाचा: मायाने सांगितले मनूच्या आईचे नाव, मालिका रंजक वळणावर

दूरदर्शन वाहिनीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर 'रामायण' मालिकेबाबत पोस्ट लिहिली आहे. "पुन्हा एकदा धर्म, प्रेम आणि दानाची अलौकिक पौराणिक कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे... संपूर्ण भारतातील सर्वात लोकप्रिय शो 'रामायण' लवकरच येत आहे. लवकरच डीडी नॅशनलवर रामायण पाहा" या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. पुन्हा एकदा रामायण ही मालिका पाहायला मिळणार असल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.

‘रामायण’ ही मालिका त्यावेळी छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका होती. ती पाहण्यासाठी लोक एकत्र जमायचे. १९८७ साली ही मालिका प्रसारित झाली होती. आजही या मालिकेची लोकप्रियता कायम असल्याचे पाहायला मिळते. आता ही मालिका पाहायला मिळणार म्हणजे ‘मंगल भवन अमंगल हारी… ‘ या ओळी पुन्हा कानावर पडणार आहे. या मालिकेला संगीत रवींद्र जैन यांनी दिले आहे.

WhatsApp channel

विभाग