मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ramanand Sagar Birthday: 'रामायण'ची निर्मिती करणारे रामनंद सागर कधीकाळी विकायचे साबण! वाचा...

Ramanand Sagar Birthday: 'रामायण'ची निर्मिती करणारे रामनंद सागर कधीकाळी विकायचे साबण! वाचा...

Dec 29, 2023 09:04 AM IST

Ramanand Sagar Birth Anniversary: 'रामायण' ही मालिका रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केली होती. या मालिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली.

Ramanand Sagar Birth Anniversary
Ramanand Sagar Birth Anniversary

Ramanand Sagar Birth Anniversary: हिंदू धर्मात 'रामायणा'चे महत्त्व खूप मोठे आहे. प्रत्येक माणसाचा रामायणाशी अगदी जवळचा संबंध आहे. पुराणातील 'रामायण' पहिल्यांदा पडद्यावर दाखवण्याचा काम रामानंद सागर यांनी केलं होतं. आज (२९ डिसेंबर) रामानंद सागर यांची जयंती आहे. 'रामायण' ही मालिका रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केली होती. या मालिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. पण, रामानंद सागर यांच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या दरम्यान त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले.

ट्रेंडिंग न्यूज

अनेक वर्षांपूर्वी टीव्हीवर 'रामायण' ही मालिका लागायची. आजही या मालिकेची लोकप्रियता तशीच आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते. सर्वांना ही 'रामायण' मालिका खूप आवडायची. 'रामायण' मालिकेची क्रेझ इतकी होती की, 'रामायण' सुरू झाल्यावर रस्त्यांवर शुकशुकाट असायचा. या 'रामायण' मालिकेचे दिग्दर्शन रामानंद यांनी केले होते. रामानंद सागर त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांचं नावच इंडस्ट्रीमधून गायब झालं.

Lai Suk Yin Death: ख्रिसमस साजरा केला अन् आयुष्य संपवलं; अभिनेत्री लाई सुक यिनचा दुर्दैवी मृत्यू

रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ला लाहोरमध्ये झाला होता. जन्मा वेळी त्यांचे नाव 'चंद्रमौली' ठेवण्यात आले होते. त्यांचे आजोबा पेशावरहून येऊन आपल्या कुटुंबासोबत काश्मीरमध्ये स्थायिक झाले. रामानंद सागर अवघ्या ५ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. रामानंद यांना लहानपणापासूनच वाचनाची आणि लेखनाची आवड होती. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी त्यांचे पहिले पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे नाव होते 'प्रीतम प्रतीक्षा'. त्या काळात रामानंद आपल्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी छोटी-मोठी नोकरी करत असत. शिपायापासून ते साबण विकण्यापर्यंतचे काम त्यांनी केले आहे. अशा छोट्या-छोट्या नोकऱ्या करून त्यांनी आपले छंद पूर्ण केले आणि अभ्यासही पूर्ण केला.

रामानंद सागर यांना लेखनाची इतकी आवड होती की, त्यांनी ३२ लघुकथा, ४ कथा, १ कादंबरी आणि २ नाटके लिहिली. पंजाबमधील दैनिक मिलापचे ते संपादक देखील होते. त्यांनी चित्रपटांमध्ये क्लॅपरबॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. नंतर रामानंद सागर यांनी पृथ्वी थिएटर्समध्ये सहाय्यक स्टेज मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली. यानंतर हळूहळू त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग