Ram Gopal Verma: राम गोपाल वर्मा यांनी केले लॉरेन्स बिश्नोईचे कौतुक, सलमान खानला लगावला टोला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ram Gopal Verma: राम गोपाल वर्मा यांनी केले लॉरेन्स बिश्नोईचे कौतुक, सलमान खानला लगावला टोला

Ram Gopal Verma: राम गोपाल वर्मा यांनी केले लॉरेन्स बिश्नोईचे कौतुक, सलमान खानला लगावला टोला

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 16, 2024 03:52 PM IST

Ram Gopal Verma: चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांना त्यांच्या ट्विटमुळे ट्रोल केले जात आहे. खरं तर या ट्विटमध्ये त्यांनी सलमान खानला टोला लगावला

Ram Gopal Verma
Ram Gopal Verma

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दकी यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे पूर्व भागात ही घटना घडली. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूची पूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने घेतले. त्यानंतर चित्रपट निर्माते, राम गोपाल वर्मा यांनी लॉरेन्स बिश्नोईवर अनेक ट्विट केले आहेत. आपल्या ताज्या ट्विटमध्ये त्यांनी लॉरेन्सच्या लूकचंही कौतुक केलं आहे. तसेच कोणताही सुपरस्टार लॉरेन्स इतका हँडसम दिसत नाही असे म्हटले आहे. तसेच या ट्विटच्या माध्यामातून त्यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला देखील चांगलेच सुनावले आहे.

लॉरेन्सची प्रशंसा करत केली पोस्ट

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. 'जर सर्वात मोठ्या गँगस्टरवर चित्रपट बनला तर कोणताही चित्रपट निर्माता दाऊद इब्राहिम किंवा छोटा राजनसारखा दिसणाऱ्या व्यक्तीला कास्ट करणार नाही. पण इथे बघा, बी (बिश्नोई) पेक्षा चांगला दिसणारा एकही सिनेस्टार मला माहित नाही' या आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली आहे.
 

सलमान खानने धमकी द्यावी अशी इच्छा

राम गोपाल वर्मा यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. 'माझी इच्छा आहे की सलमान खानने बीला चांगली धमकी द्यायला हवी. नाही तर टायगर स्टार घाबरला असे वाटेल. सलमानची त्याच्या चाहत्यांप्रती काही जबाबदारी आहे. तो बीच्या तुलनेत सुपरहिरो वाटायला हवा' या आशयाची दुसरी पोस्ट केली आहे.
वाचा: अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू, शब्दही फुटत नव्हते

नेटकऱ्यांनी उडवली राम गोपाल वर्मा यांची खिल्ली

राम गोपाल वर्मा यांच्या दोन्ही सोशल मीडिया पोस्ट या तुफान व्हायरल झाल्या आहेत. एका यूजरने, 'लॉरेन्स बिश्नोईच्या बायोपिकमध्ये तुम्ही त्याला खलनायकाच्या भूमिकेत कास्ट केले पाहिजे' असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'तुम्ही लोक रीचसाठी काहीही ट्विट करता' असे म्हणत सुनावले आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'लॉरेन्स बिश्नोई राम गोपाल वर्माचा नवा क्रश बनला आहे' असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे.

Whats_app_banner