चित्रपट निर्माता आणि अभिनेता राम गोपाल वर्मा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी विशेष ओळखले जातात. ते सतत कोणत्या ना कोणत्या विषयांवर मत मांडताना दिसतात. आता त्यांनी 'पुष्पा २: द रूल' चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर भाष्य केले आहे. अल्लू अर्जुनला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आणि तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी अंतरिम जामिनावर सुटका केली. या वृत्तावर प्रतिक्रिया देताना रामगोपाल वर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले आहे.
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले की, "तेलंगणाचे माननीय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनसोबत असे का केले? याचा विचार करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. 'पुष्पा २ : द रूल'च्या दुसऱ्या आठवड्याचे कलेक्शन वाढावे म्हणून तेलंगण राज्याच्या लाडक्या सुपुत्राला मोठी प्रसिद्धी द्यायची होती म्हणून त्यांनी हे केले असे मला वाटते."
अर्जुनला काही तासांत जामीन मिळावा म्हणून राज्य सरकारने जाणीवपूर्वक खटला कमकुवत केल्याचा दावा ही प्रसिद्धी स्टंट असल्याचे राम गोपाल वर्मा सांगितले आहे. "यावरून असे दिसून येते की राज्य सरकारने जाणूनबुजून इतका कमकुवत खटला चालवला जेणेकरून त्याला (अल्लू अर्जुनला) काही तासांत जामीन मिळेल आणि त्याला मिळालेल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर दीर्घकाळ राज्य करू शकेल. 'पुष्पा २ : द रूल'च्या सुपर कलेक्शनप्रमाणे तेलंगण राज्याची शान सर्वोच्च स्थानी आणल्याबद्दल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आभार" असे म्हणत राम गोपाल वर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी सांगितले होते की, ज्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती, त्या प्रकरणात राज्य सरकारचा हात नाही. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आजतकशी बोलताना सांगितले होते की, कायदा फक्त आपले काम करत आहे.
संबंधित बातम्या