सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांची हवा पाहायला मिळते. अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहेत. त्यात दिग्दर्शक राजमौली यांचे एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यांनी भारतीय सिनेमाचे नाव उंचावले आहे. दरम्यान, राजामौली यांच्यावर इतर चित्रपट निर्माते जळत असल्याचे ट्वीट दिग्दर्शक राम गोपाल वर्माने केले आहे.
राम गोपाल वर्मा यांचे प्रत्येक ट्वीट हे वादग्रस्त असते. आता देखील त्यांनी केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'नमस्कार राजामौली सर, मुघले आजम बनवणाऱ्या के आसिफ, शोल करणाऱ्या रमेश सिप्पी, आदित्य चोप्रा, भन्साळी या सर्वांना तुम्ही मागे टाकले आहे. तुमचा आशिर्वाद घ्यायचा आहे. एक भारतीय सिनेमा इतक्या मोठ्या ठिकाणी पोहोचेल याचा विचार दादासाहेब फाळके यांनीही केला नसेल. तुम्हालाही वाटलं नसेल कधी इतकं यश मिळेल ते' या आशयाचे ट्वीट राम गोपाल वर्माने केले आहे.
वाचा: 'बांबू'त लागणार प्रेमाचे बदामी बाण; गाण्यातील समीर चौघुलेंचा लूक पाहून होईल हसू अनावर
पुढे त्याने आणखी एक ट्वीट करत राजामौली यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. 'सर तुमच्या सुरक्षतेत वाढ करा. कराण इतर काही फिल्मेकर केवळ इर्षेतून तुमची हत्या करण्याचा कट रचत आहेत. मीही त्यामध्ये सामिल आहे. मी नशेत असल्यामुळे हे सिक्रेट सांगतो आहे' असे राम गोपाव वर्माने म्हटले.
राम गोपाल वर्माने राजामौली यांचे काम पाहून हे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने कौतुक तर केले आहे पण अगदी विचित्र स्टाइलने. या ट्वीटमध्ये त्याने राजामौली यांचा जेम्स कॅमेरुनसोबत झालेल्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.