Ram Gopal varma Social media Post: प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कामच चर्चेत असतो. कधी त्याच्या वायफळ वक्तव्यांमुळे तर कधी सोशल मीडियावर अभिनेत्रींसोबत शेअर केलेल्या फोटोंमुळे राम गोपाल वर्मा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर राम गोपाल वर्माची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने राजकारणात एण्ट्री केल्याचे सांगितले आहे.
राम गोपाल वर्माने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, 'अचानक मी घेतलेला हा निर्णय आहे. मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की मी पिठापुरम येथून निवडणूक लढणार आहे' असे म्हटले आहे. सोबतच फुलांच्या गुच्छाचा इमोजी राम गोपाल वर्माने वापरला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे. एका यूजरने राम गोपाल वर्माला शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या एका यूजरने हा माणूस उगाच काही तरी करत असतो असे म्हटले आहे.
वाचा: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?
राम गोपाल वर्मा पिठापुरम येथून निवडणूक लढणार आहेत. याच ठिकाणाहून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण देखील निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. पवन कल्याण हा देखील सुपरस्टार अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि नेता आहे. पिठापुरम हे आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गोदावरी नदीच्या किनारी वसले आहे.
वाचा: 'तो काय काम करतो हे मलाही...', सेलिब्रिटींसोबत दिसणाऱ्या ऑरीबाबत रणवीरचे वक्तव्य
राम गोपाल वर्माने आजवर काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये 'शिवा', 'रंगीला', 'सत्या' आणि 'कंपनी' या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. राम गोपाल वर्माला या चित्रपटांतून नफा झाला होता. हिंदी चित्रपटांसोबतच राम गोपाल वर्माने तेलुगू इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले आहे. आता तो राजकारणात एण्ट्री करणार असल्यामुळे चाहते उत्सुक झाले आहेत.
राम गोपाल वर्माचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्याच्या या कंपनीचे नाव 'आरजीवी वर्ल्ड' असे आहे. या कंपनीच्या माध्यमातून चित्रपट, टीव्ही मालिका आणि जाहिरांतीची निर्मिती केली जाते. या सगळ्यामधून राम गोपाल वर्मा वर्षाला ५० लाख डॉलर्स म्हणजेच २ कोटी ५० लाख रुपयांची कमाई करतो.