मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  राम गोपाल वर्मा यांच्या ‘या’ ५ चित्रपटांपुढे हॉलिवूडपटही वाटतील पानी कम! तुम्ही पाहिलेत का?

राम गोपाल वर्मा यांच्या ‘या’ ५ चित्रपटांपुढे हॉलिवूडपटही वाटतील पानी कम! तुम्ही पाहिलेत का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 07, 2024 08:35 AM IST

आज जरी राम गोपाल वर्मा याचा पूर्वीसारखा करिष्मा दिसत नसला, तरी एक काळ असा होता की, केवळ त्याच्या नावावर चित्रपट चालायचे.

राम गोपाल वर्मा यांच्या ‘या’ ५ चित्रपटांपुढे हॉलिवूडपटही वाटतील पानी कम! तुम्ही पाहिलेत का?
राम गोपाल वर्मा यांच्या ‘या’ ५ चित्रपटांपुढे हॉलिवूडपटही वाटतील पानी कम! तुम्ही पाहिलेत का?

राम गोपाल वर्मा भारतीय चित्रपटसृष्टीतील हे एक असे नाव आहे, ज्याने केवळ चित्रपटच बनवले नाहीत, तर वेगवेगळे प्रयोगही केले. आज जरी राम गोपाल वर्मा याचा पूर्वीसारखा करिष्मा दिसत नसला, तरी एक काळ असा होता की, केवळ त्याच्या नावावर चित्रपट चालायचे. त्या काळात राम गोपाल वर्माची तुलना हॉलिवूडच्या निर्मात्यांशी केली जात होती. आज, ७ एप्रिल रोजी राम गोपाल वर्मा त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने आज आपण त्यांच्या अशा ५ चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, जे कल्ट क्लासिक चित्रपट तर आहेतच, पण लोकप्रियतेच्या बाबतीत हॉलिवूड चित्रपटांनाही टक्कर देतात.

ट्रेंडिंग न्यूज

सत्या

राम गोपाल वर्माचा मास्टरपीस चित्रपट 'सत्या' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम गँगस्टर चित्रपट म्हणता येईल. या चित्रपटात उर्मिला मातोंडकरसह मनोज बाजपेयी, जेडी चक्रवर्ती आणि शेफाली शाह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या सत्याची कथा आहे. परिस्थिती त्याला गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डच्या जगात घेऊन जाते. 'सत्या' चित्रपटात मनोज बाजपेयी मुख्य अभिनेता नव्हता, पण या चित्रपटातील भिकू म्हात्रे या त्याच्या भूमिकेने त्याला स्टार बनवले. उर्मिलाचा साधेपणा हृदयाला भावणारा होता आणि जेडीच्या निरागस डोळ्यांनी लोकांना संमोहित केले.

बॉलिवूडचा ‘जंपिंग जॅक’ अभिनेता जितेंद्र यांच्याबद्दल ‘या’ रंजक गोष्टी माहितीयेत का?

रंगीला

'रंगीला'ने राम गोपाल वर्माच्या लाडक्या अभिनेत्रीला म्हणजेच उर्मिला मातोंडकरच्या करिअरला चालना दिली. या चित्रपटात उर्मिलाचे शारीरिक आणि अभिनय सौंदर्य दाखवण्यात राम गोपाल वर्मा यांनी कोणतीही कसर सोडली नाही. या चित्रपटात आमिर खान आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत. ही कथा एका चाळीत राहणाऱ्या एका मुलीची आहे, जिला सिनेमाच्या दुनियेत चमकायचे आहे. तिचा एक बालपणीचा मित्र आहे, जो तिच्यसाठी सिनेमाची तिकिटे विकत घेतो. एक सुपरस्टार आहे, जो उर्मिलाच्या प्रेमात पडतो. ही कथा एक प्रेम त्रिकोण आहे.

कौन?

उर्मिला मातोंडकर, मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंग अभिनीत हा रहस्यमय-थ्रिलर चित्रपट अंगावर अक्षरशः शहारे आणणारा आहे. चेंबर फिल्म मेकिंगचे हे एक अद्भुत उदाहरण आहे, कारण संपूर्ण चित्रपट एकाच ठिकाणी शूट केला गेला आहे. या चित्रपटात फक्त तीनच पात्रे आहेत. ही कथा एका मुलीची आहे, जी घरी एकटीच राहते. ती टीव्हीवर सिरीयल किलरची बातमी पाहते आणि मग एक अज्ञात व्यक्ती दारावरची बेल वाजवते. राम गोपाल वर्मा यांनी हा चित्रपट इतका सुंदरपणे साकारला आहे की, पाहणाऱ्याची नजर जराही हटत नाही.

‘महागुरू’ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; अखेर सचिन पिळगावकर यांनी थेट दिलं उत्तर!

कंपनी

राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'कंपनी' हा एक अप्रतिम क्राईम-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉयसह अजय देवगण, मोहनलाल, सीमा बिस्वास आणि अंतरा माळी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा अजय देवगणच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या गुन्हेगारी सिंडिकेटची आहे. दिग्दर्शकाच्या 'सत्या' या चित्रपटाचा हा सिक्वेल असून, त्याचा तिसरा भाग रणदीप हुड्डा आणि यशपाल शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'डी' चित्रपट आहे, असे म्हटले जाते.

रक्त चरित्र

‘रक्त चरित्र’ हा चित्रपट दोन भागात बनवण्यात आला होता. याने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही, पण हा एक उत्तम चित्रपट आहे. यात विवेक ओबेरॉय, शत्रुघ्न सिन्हा, सुदीप आणि अभिमन्यू सिंह यांच्या भूमिका आहेत. हा एक राजकीय-ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट आंध्र प्रदेशातील दिग्गज राजकारणी परितला रवींद्र यांच्या जीवनावर आधारित आहे.

IPL_Entry_Point