सध्या संपूर्ण देशात दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पाहायला मिळत आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष पसंतील उतरून असून जगभरात बक्कळ कमाई करताना दिसत आहेत. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'गेम चेंजर' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया दोन दिवसात चित्रपटाने किती कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिस वेबसाइटच्या अहवालानुसार या चित्रपटाने पहिल्या शनिवारी भारतात २०.०५ कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ७१.०५ कोटी रूपयांची कमाई केली आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या कमल हासन यांच्या 'इंडियन २' या चित्रपटाच्या तुलनेत 'गेम चेंजर' सिनेमाचे तेलुगु बॉक्स ऑफिस कलेक्सशन हे चांगले असल्याचे दिसत आहे. 'इंडियन २'ने पहिल्याच दिवशी २५.६ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर भारतात ८१.३२ कोटी रुपयांची कमाई केली होती. वीकेंड असूनही तेलुगू व्हर्जनमध्ये सकाळसाठी फक्त २०.६६%, दुपारच्या शोसाठी ३१.५२% आणि संध्याकाळच्या शोसाठी ३६.०९% ऑक्युपेन्सी होती. चित्रपटाच्या तमिळ आणि हिंदी भाषेच्या आवृत्यांनी चांगली कमाई केली आहे.
'गेम चेंजर' सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. रामच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि चित्रपटाचा काही भाग कालबाह्य असल्याची टीका झाली. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण आता आगामी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांना टक्कर द्यावी लागणार आहे. बॉबी कोलीचा बालकृष्ण, बॉबी देओल, उर्वशी रौतेला, श्रद्धा श्रीनाथ आणि प्रज्ञा जयस्वाल स्टारर डाकू महाराज हा चित्रपट १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनिल रविपुडी यांचा व्यंकटेश, मीनाक्षी चौधरी आणि ऐश्वर्या राजेश स्टारर संक्रांतीकी वास्तुम हा चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा २: द रूल' १७ जानेवारीपासून २० मिनिटांचे अतिरिक्त फुटेज प्रदर्शित करणार आहे.
वाचा: दिवसा मला आई म्हणायचे अन् रात्री झोपायला बोलवायचे; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
चेंजर राम नंदन नावाचा आयएएस अधिकारी आणि अप्पण्णा नावाचा कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत राम चरण दिसतो. कियारा अडवाणीने त्याची प्रेयसी दीपिकाची भूमिका साकारली आहे, अंजली पार्वतीच्या भूमिकेत आहे तर सूर्या मोपीदेवी नावाच्या भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारत आहे. श्रीकांत, समुथिरकणी, सुनील, ब्रह्मानंदम, वेनेला किशोर आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
संबंधित बातम्या