लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रामचरण टॉलिवूडसह बॉलीवूडमध्येही तगडी फॉलोविंग आहे. मुली तर त्याच्यावर जीव ओवाळून टाकताना दिसतात. परंतु, मुलींची मनं तर तुटली होती जेव्हा त्याने १० वर्षांपूर्वी उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) सोबत लग्नगाठ बांधली. आज २७ मार्च रोजी रामचरणचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया राम चरण एका साधारण मुलीच्या प्रेमात कसा पडला? त्यांची भेट कशी झाली.
रामचरण हा साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना अनेक मुली त्याच्या प्रेमात पडायच्या. मात्र या दिवसांमध्ये रामचरण एका मुलीच्या प्रेमात होता. ती एक सर्वसाधारण मुलगी होती. रामचरणच्या प्रेयसीचे नाव उपासना कामिनेनी आहे. कॉलेजच्या दिवसापासून उपासना आणि रामचरण एकमेकांसोबत आहेत. रामचरण आणि उपासना यांनी १४ जून २०१२ साली लग्नगाठ बांधली होती. रामचरण आणि उपासना १० वर्षांपासून एक सुखी आणि आनंदी आयुष्य जगत आहेत.
वाचा: 'तू झूठी मैं मक्कार'ची बॉक्स ऑफिसवर हवा, जाणून घ्या कमाई
उपासना ही एका व्यावसायिक कुटुंबातील असून ती स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहे. उपासनाचे आजोबा डॉ. प्रताप सी रेड्डी हे अपोलो हॉस्पिटलचे अध्यक्ष आहेत. उपासना अपोलो लाईफची उपाध्यक्षा आहे. यासोबतच ती बी पॉझिटिव्ह नावाच्या मासिकाच्या संपादकही आहेत. उपासनाने लंडनच्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. आज त्यांचा सुखी संसार सुरु आहे.
संबंधित बातम्या