Rakul Preet Singh: एका चुकीमुळे रकुल प्रीत सिंहची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी दिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakul Preet Singh: एका चुकीमुळे रकुल प्रीत सिंहची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी दिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला

Rakul Preet Singh: एका चुकीमुळे रकुल प्रीत सिंहची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी दिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 16, 2024 03:31 PM IST

Rakul Preet Singh: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह बेड रेस्टवर आहे. पण असे नेमके काय झाले की रकुल प्रीत सिंहला बेड रेस्ट घ्यावा लागला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Rakul Preet Singh
Rakul Preet Singh

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही तिच्या चित्रपटांमुळे किंवा लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या एका वेगळ्या कारणामुळे रकुल प्रीत चर्चेत आहे. रकुल बेड रेस्टवर असल्याची माहिती समोर येत आहे. आता रकुल प्रीत सिंहला असे काय झाले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया रकुलच्या प्रकृतीविषयी आणि नेमकं काय झालं त्याविषयी...

खरं तर ५ ऑक्टोबर रोजी रकुल प्रीत सिंह ही जीममध्ये व्यायाम करत होती. व्यायाम करताना तिने एक छोटीशी चूक केली, ज्यामुळे त्याची पाठ दुखू लागली. अशावेळी डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, पण कामाच्या कमिटमेंट्समुळे तिने विश्रांती घेण्याऐवजी कामाला जायला सुरुवात केली. त्यामुळे तिचा त्रास वाढला.

जीम मध्ये उचलले वजन

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, वर्कआउट सेशनदरम्यान रकुलने कंबरेवर बेल्ट न लावता ८० किलो किलो वजन उचलत होती. अशा तऱ्हेने डेडलिफ्टिंग करताना तिची पाठीची शिर ओढली गेली आणि त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी तिला आठवडाभर बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला. पण रकुलला अजय देवगणसोबत 'दे दे प्यार दे २'चं शूटिंग पूर्ण करायचे होते. तिने पेनकिलर घेऊन शुटिंग करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता याचा मोठा परिणाम झाल्याचे रकुलला जाणवत आहे.

वाढदिवस पार्टीच्या काही तास आधी बिघडली प्रकृ ती

शुटिंग सुरु असताना रकुलच्या पाठीत दर तीन- चार तासांनंतर दुखायला लागले होते. रकुलने या वेदनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीच्या तासाभरापूर्वी तिची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी सांगितले की, दुखापतीमुळे रकुलच्या एल ४, एल ५ आणि एस ३ व्हेन्स जॅम झाल्या आहेत. झाल्या आहेत. यानंतर डॉक्टरांनी तिला औषधासह इंजेक्शन दिले. आता रकुलची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगितले जात आहे. ती हळूहळू बरी होत आहे.
वाचा: अतुल परचुरेंबद्दल बोलताना निवेदिता सराफांना कोसळले रडू, शब्दही फुटत नव्हते

रकुल प्रीत सिंहच्या कामाविषयी

रकुल प्रीत सिंह लवकरच ‘ दे दे प्यार दे’, ‘रेड २ ’, ‘ हाऊसफूल ३ ’, ‘ गोलमाल ५ ’, ‘ सन ऑफ सरदार २ ’, ‘ धडक ’ या चित्रटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. ती या चित्रपटांचे सध्या चित्रीकरण करत असून अचानक तिची प्रकृती बिघडली.

Whats_app_banner