Rakulpreet Singh Wedding Date: गेल्या वर्षात अर्थात २०२३मध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. आता नव्या वर्षात म्हणजे२०२४मध्ये देखील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकणार आहेत. बॉलिवूड आमिर खानची मुलगी आयरा खान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न करणार आहे. आता या वर्षी आणखी एक जोडी लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लवकरच लग्न करणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे.
मीडियारिपोर्टनुसार, रकुल आणि जॅकी फेब्रुवारीमध्ये गोव्यात लग्न करणार आहेत. रिपोर्टनुसार, एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रकुल आणि जॅकी२२ फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्न करत आहेत. या लग्नाबद्दल त्यांनी मौन बाळगलं असून, ते दोघेही अतिशय खाजगी पद्धतीने हा विवाह सोहळा आयोजित करणार आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘रकुल आणि जॅकी दोघही अतिशय प्रायव्हसी जपणाऱ्या व्यक्ती आहेत. दोघांनाही आपले लग्न अतिशय खाजगी ठेवायचे आहे. सध्या ते लग्नसमारंभात व्यस्त होण्यापूर्वी सुट्टीचा आनंद घेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जॅकी सध्या त्याच्य बॅचलर पार्टीसाठी बँकॉक (थायलंड) येथे गेले आहे. सध्या रकुल देखील थायलंडमध्ये आहे आणि सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
रकुल आणि जॅकी यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही अशाच बातम्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पण, नंतर अभिनेत्रीने त्याचे खंडन केले होते. रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांची लव्ह लाईफही सध्या प्रचंड चर्चेत आहे. दोघेही २०२१पासून एकमेकांना डेट करत आहेत. रकुल प्रीत सिंह लवकरच कमल हासनसोबत ‘इंडियन २’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा प्रीक्वल १९९६मध्ये रिलीज झाला होता,ज्यामध्ये कमल हासन यांनी एका वृद्ध स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली होती.