मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakshabandhan 2022: भावाबहिणीच्या अतूट नात्यावर भाष्य करणारे पाहायलाच हवेत असे चित्रपट

Rakshabandhan 2022: भावाबहिणीच्या अतूट नात्यावर भाष्य करणारे पाहायलाच हवेत असे चित्रपट

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 11, 2022 11:44 AM IST

(movies for rakshabandhan 20220)आज ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सोहळा सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा होतोय. त्यामुळे भाव बहिणींमधलं प्रेम दाखवणारे बॉलिवूडमधील काही सुंदर चित्रपट तुम्ही नक्की पाहायला हवेत.

भावाबहिणीच्या अतूट नात्यावर भाष्य करणारे चित्रपट
भावाबहिणीच्या अतूट नात्यावर भाष्य करणारे चित्रपट

(movies shows siblings bond rakshabandhan special) रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या नात्यातलं प्रेम वाढवणारा दिवस. आज गुरुवारी, ११ ऑगस्ट रोजी हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूडने गेल्या काही वर्षांत भाव बहिणीच्या पवित्र नात्यावर अनेक चित्रपट बनवले आहेत. देव आनंदच्या 'हरे रामा हरे कृष्णा'मध्ये तो आपल्या हरवलेल्या बहिणीला शोधत होता, तर अमिताभ बच्चनने 'मजबूर' मध्ये आपल्या बहिणीच्या भविष्याचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. पाहूया असेच काही चित्रपट.

हरे रामा हरे कृष्णा

हरे रामा हरे कृष्णा

हरे रामा हरे कृष्णा

१९७१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट लहानपणी वेगळे झालेल्या भाऊ आणि बहिणीबद्दल आहे. चित्रपटात देव आनंद, यांनी भाऊ प्रशांतची भूमिका केली आहे, ते त्यांची बहीण, जसबीर (झीनत अमान) च्या शोधात आहेत जी ड्रग्सच्या अंधाऱ्या जगात एक आशेचा किरण शोधत आहे.

मजबूर

मजबूर

मजबूर

अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित झाला होता. बच्चन यांनी रवी खन्ना याची भूमिका साकारली होती, जो दोन लहान भावंड आणि विधवा आईच्या कुटुंबाचा आधार आहे. जेव्हा त्याला त्याच्या दुर्धर आजाराची माहिती मिळते तेव्हा तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बक्षीस रक्कम गोळा करण्यासाठी न केलेल्या गुन्ह्याची खोटी कबुली देतो. मात्र, तुरुंगात असताना त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होते. त्यानंतर खऱ्या मारेकऱ्याची ओळख पटवण्यासाठी तो तुरुंगातून पळून जातो.

सरबजीत

सरबजीत

सरबजीत

२०१६ चा हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता. ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिने रणदीप हुडाच्या बहिणीची भूमिका केली होती. पाकिस्तानच्या तुरुंगात फाशीची शिक्षा झालेल्या सरबजीत (रणदीप)च्या सुटकेसाठी दलबीर (ऐश्वर्या) लढा देते.

फिजा

फिजा

फिजा

२००० मध्‍ये रिलीज झालेला क्राइम थ्रिलर 'फिजा' हा भावनांचा रोलरकोस्टर राईड आहे. 'फिजा' मध्ये (करिश्मा कपूर) १९९३ च्या मुंबईत झालेल्या दंगलीत हरवलेला तिचा भाऊ अमान (हृतिक रोशन) च्या शोधात निघते.

दिल धडकने दो

दिल धडकने दो

दिल धडकने दो

झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात कॉमेडी ड्रामा आहे. यात रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत होते. प्रियांकाला तिचा पती (राहुल बोस) वाईट वागणूक देतो आणि तिचे आईवडीलही तिच्या विरोधात जातात तेव्हा तिचा भाऊ तिच्या पाठीशी उभा राहतो. ती देखील त्याच्या पाठीशी उभी राहते.

माय ब्रदर निखिल

माय ब्रदर निखिल

माय ब्रदर निखिल

२००५ च्या या चित्रपटात निखिलचं आयुष्य दाखवण्यात आलं होतं जो त्याला एचआयव्ही/एड्स असल्याचे लोकांच्या वाईट वागणुकीला सामोरा जात होता. या चित्रपटात संजय सूरीने निखिल कपूरची भूमिका साकारली होती, तर जुही चावलाने त्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका केली होती.

इक्बाल

इक्बाल

इक्बाल

'इक्बाल' हा नागेश कुकुनूर दिग्दर्शित 2005 चा चित्रपट आहे ज्यात मुख्य नायक इक्बाल (श्रेयस तळपदे) हा एक मूक-बधिर मुलगा आहे जो संवाद साधण्यासाठी त्याच्या बहिणीची (श्वेता प्रसाद) मदत घेतो. क्रिकेटपटू बनण्याचे आणि भारतीय राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती त्याला प्रोत्साहित करते.

जोश

जोश

जोश

२००० मध्ये प्रदर्शित झालेला 'जोश' हा एक रोमँटिक अॅक्शन चित्रपट आहे, ज्यात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन जुळी मुले आहेत.

हम साथ साथ हैं

हम साथ साथ हैं

हम साथ साथ हैं

१९९९ मध्ये रिलीज झालेल्या, 'हम साथ साथ है' मध्ये सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल आणि नीलम कोठारी यांचा समावेश आहे, जे चित्रपटात भावंडांची भूमिका करत आहेत. हा चित्रपट एक कौटुंबिक नाट्य आहे. आणि यात भावंडांचं अतूट प्रेम दाखवण्यात आलं आहे.

हम साथ साथ हैं

हम साथ साथ हैं

कभी खुशी कभी गम

२००१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सावत्र भाऊ राहुल (शाहरुख खान) आणि रोहन (हृतिक रोशन) आणि बहिणी अंजली (काजोल) आणि पूजा (करीना कपूर खान) यांच्यातील नात्यावर भाष्य करतो. .

IPL_Entry_Point