Rakhi Sawant Pakistan Marriage : आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंत हीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. राखी सावंतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा कथित बॉयफ्रेंड डोडी खानबद्दल सांगितले. इतकंच नाही तर, तिला पाकिस्तानात जाऊन लग्न करायचं आहे आणि भारतात येऊन रिसेप्शन करायचं आहे, असंही तिनं सांगितलं. राखी सावंत हीच हा कथित बॉयफ्रेंड डोडी खान कोण आहे? जाणून घेऊया…
राखी सावंतने टाइम्स ऑफ इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपण पाकिस्तानला जाऊन आल्याचा दावा केला आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की, ‘माझ्यासाठी पाकिस्तानातून लग्नाची मागणी आली आहे. मी पाकिस्तानला गेले होते, तेव्हा त्यांनी माझी अवस्था पाहिली. माझ्या आधीच्या लग्नात मला किती त्रास दिला गेला हे त्यांनी पाहिलं होतं.’
यानंतर राखी सावंत हिने भारत-पाक संबंधांविषयी देखील भाष्य केलं. राखीने दुबई आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी स्थायिक झालेल्या भारतीय आणि पाकिस्तानी लोकांचे उदाहरण दिले. इतकंच नाही तर अशा भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये शांतता वाढेल, असंही राखी म्हणाली.
राखी सावंत म्हणाली की, ‘भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय जगूच शकत नाहीत. मला पाकिस्तानी लोक खूप आवडतात. तिथे माझे खूप चाहते आहेत.’ यानंतर राखीने तिचा कथित बॉयफ्रेंड डोडी खानबद्दल सांगितले. आमचे लग्न पाकिस्तानात इस्लामी रीतीरिवाजानुसार पार पडणार आहे. रिसेप्शन भारतात होईल आणि हनीमूनसाठी आम्ही स्वित्झर्लंड किंवा नेदरलँडला जाणार आहोत. मग आम्ही दुबईत स्थायिक होऊ, असे राखी सावंत म्हणाली.
‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हीच कथित बॉयफ्रेंड डोडी खान हा पाकिस्तानी आहे. तो एक लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेता आणि मॉडेल आहे. डोडी खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि आपल्या इन्स्टाग्रामवर राखीसाठी अनेक व्हिडिओ पोस्ट देखील करत असतो.
नुकताच डोडी खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डोडी म्हणत आहे की, ‘सलाम राखी जी, सर्व प्रथम तुम्हाला उमराहच्या शुभेच्छा. मला फक्त सांगा की, लग्नाची वरात घेऊन भारतात यायचे आहे की दुबई? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.’ डोडीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच युजर्सनीही त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. डोडीच्या या व्हिडिओवर राखीने हसणारा इमोजीही शेअर केला आहे.
संबंधित बातम्या