मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: रिहाना, अ‍ॅकॉन माझ्यासमोर ‘मुंगफली’! अंबानींनी प्री-वेडिंग सोहळ्याला न बोलावल्यामुळे चिडली राखी सावंत

Viral Video: रिहाना, अ‍ॅकॉन माझ्यासमोर ‘मुंगफली’! अंबानींनी प्री-वेडिंग सोहळ्याला न बोलावल्यामुळे चिडली राखी सावंत

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 07, 2024 10:18 AM IST

Rakhi Sawant Viral Video: राखी सावंतच्या नव्या व्हिडीओमध्ये तिने थेट अंबानींना प्रश्न विचारले आहेत. इतकंच नाही तर, तिने स्वतःची तुलना रिहानाशी केली आहे.

Rakhi Sawant Viral Video
Rakhi Sawant Viral Video

Rakhi Sawant Viral Video: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती अंबानींना प्रश्न करताना दिसत आहे. राखीने या व्हिडीओमध्ये अशी काही वक्तव्य केली की, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राखी सावंतच्या या नव्या व्हिडीओमध्ये तिने थेट अंबानींना प्रश्न विचारले आहेत. इतकंच नाही तर, तिने स्वतःची तुलना रिहानाशी केली आहे. या व्हिडीओतून तिने अंबानींना एक खास ऑफरही दिली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून आता सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला आहे.

राखी सावंत या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसली आहे की, 'नमस्कार अंबानी जी, तुम्ही मला लग्नाचे आमंत्रण का नाही दिले? तुला माहित आहे, जर तुम्ही मला बोलावले असते तर मी फरशी, खुर्च्या मोडल्या असत्या. अंबानी जी, तुम्ही अजून माझा डान्स पाहिला नाही. रिहाना, अ‍ॅकॉन कोण आहे हे, कोणाला बोलावलं तुम्ही? हे सगळे लोक माझ्यासमोर शेंगदाणे आहेत. तुम्ही माझा डान्स पाहिला का? मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, टुक-टुक देख, परदेसिया, मी अशी अनेक गाणी केली आहे. अंबानीजी तुम्ही मला का नाही बोलावलं? तुम्ही तिला हजारो कोटी देऊन निमंत्रित केले, तरीही रिहाना फाटक्या कपड्यात आली. मी असते सेक्सी कपडे परिधान करून आले असते.’

Lokshahi On OTT: महिला दिनी तेजश्री प्रधानचं चाहत्यांना खास गिफ्ट; ओटीटीवर पाहायला मिळणार ‘लोकशाही’!

मला बोलावलं असतं तर...

राखीने या व्हिडीओमध्ये तिला बोलावण्याचे ४ फायदे देखील सांगितले आहेत. ती म्हणाली, 'मला बोलावले असतेत तर, ४ फायदे झाले असते. मी लोकांचे मनोरंजन केले असते, मी डान्स केला असता, तुमच्या सर्व पाहुण्यांचे जेवण झाल्यावर त्यांची भांडी दुतली असती. सगळ्या पाहुण्यांच्या खोल्याही स्वच्छ केल्या असत्या. अजून काय काय केलं असतं विचारा... हजारो कोटी खर्च करून तुम्ही कोणाला बोलावले? अहो, तुम्ही राखी सावंतला फोन केला नाही.’

अनंत अंबानींबद्दल राखी सावंत काय म्हणाली?

राखी सावंतने या व्हिडीओमध्ये अनंत अंबानींबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी म्हटल्या आहेत. राखीने म्हटले की, 'अंबानीजी, अनंतला ५ दिवसांसाठी माझ्या हवाली करा. यानंतर मी त्यांच्यासोबत काय काय करेन, हे सांगण्यासारखे नाही.’ या व्हिडीओमध्ये राखीने अनंत अंबानींना बॉडी शेम करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. आता राखीच्या याच गोष्टी तिच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IPL_Entry_Point