Rakhi Sawant Healt Update: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant Healt Update: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

Rakhi Sawant Healt Update: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 15, 2024 08:08 AM IST

Rakhi Sawant Healt Update: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राखी रुग्णालयात दाखल असल्याचे दिसत आहे. पण राखीला असे काय झाले की रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

राखी सावंत रुग्णालयात दाखल
राखी सावंत रुग्णालयात दाखल

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत काहीना काही उद्योग करताना दिसते. तिचे व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर राखीचे रुग्णालयात दाखल झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये नर्स राखीचे ब्लड प्रेशर चेक करत आहे. असे नेमके काय झाले की राखीला रुग्णालयात दाखल व्हावे लागले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

राखी सावंतला काय झाले?

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने 'राखी सावंतला हृदयाशी संबंधीत कोणत्या तरी आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. आम्ही डॉक्टरांकडून राखीच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहोत. राखी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करुया आणि पुन्हा राखी तिच्या क्रेझी अंदाजात आपल्याला भेटेल अशी अपेक्षा करुया' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: १० फ्लॉप चित्रपटांनंतर राजकुमारचा 'श्रीकांत' ठरतोय हिट, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई

काय आहे फोटो?

फोटोमध्ये राखी हॉस्पिटलच्या बेडवर झोपली असल्याचे दिसत आहे. एक नर्स तिचे ब्लड प्रेशर चेक करत आहे. तर दुसऱ्या बोटाला ऑक्सिजन चेक करण्याची मशीन दिसत आहे. तर डोक्याच्या वर हार्ट रेट मोजण्याची मशीन दिसत आहे. एकंदरीत फोटो पाहाता राखीला काही तरी झाले असल्याचे तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट होत आहे.
वाचा: ‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

सोशल मीडियावर विरल भय्यानीची ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'भगवान हॉस्पिटल वाल्यांना हिम्मत देवो' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'ती कशी ही असेल, पण देवा कुणाला जास्त हॉस्पिटल दाखवू नकोस' असे म्हणत काळजी व्यक्त केली आहे. तिसऱ्या यूजरने 'ओवर अॅक्टिंगचे साइड इफेक्ट्स' असे म्हणत राखीची खिल्ली उडवली आहे. एका यूजरने तर 'माझा यावर विश्वाच बसत नाही. कारण राखी नेहमीच काही तरी ड्रामा करत असते' असे म्हटले आहे. आता या सगळ्यावर राखी काय प्रतिक्रिया देते हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: '३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधले', मतदार यादीतून अभिनेता सुयश टिळकचे नाव गायब

 

Whats_app_banner