बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत काहीना काही उद्योग करत असते. कधी विचित्र कपडे घालून रस्त्यावर फिरत असते तर कधी कोणाची मिमिक्री करत असते. तिचे व्हिडीओ सतत सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर राखीचे रुग्णालयात दाखल झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन राखीने नवा ड्रामा क्रिएट केल्याचे बोलले जात होते. पण आता जवळच्या व्यक्तीने माहिती देते राखीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राखी हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. एक नर्स तिचे ब्लड प्रेशर चेक करत आहे तर दुसरीकडे तिच्या बोटाला ऑक्सिजन चेक करण्याची मशीन लावलेली दिसत आहे. राखीच्या डोक्याच्या वर हार्ट रेट मोजण्याची मशीन दिसत आहे. राखीचा हा फोटो पाहून अनेकांनी नवा ड्रामा असे म्हटले होते. पण आता खरी माहिती समोर आहे. राखीचा पूर्व पती रितेशने याबाबत माहिती दिली आहे.
वाचा: सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या काय होते कारण?
"राखी सावंत कोणतेही नाटक करत नाही. तिची प्रकृती खरोखरच अत्यंत गंभीर आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तिला छातीमध्ये दुखत असून त्रास होता होता. मात्र, त्रास वाढल्याने तिला रूग्णालयात घेऊन जात असताना ती बेशुद्ध पडली होती. आता राखी सावंतवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत" असे रितेश म्हणाला.
वाचा: मराठमोळ्या सोनालीला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर करणार होता प्रपोज पण...
पुढे रितेश म्हणाला, "सध्या मी राखी सावंतसोबत आहे. राखीची तब्येत अतिशय नाजूक. राखी सावंतच्या बऱ्याच टेस्ट अजून बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा." सध्या राखीवर नेमक्या कोणत्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही.
वाचा: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचे फोटो शेअर ती आजारी असल्याची माहिती दिली होती. हे फोटो शेअर करत त्याने 'राखी सावंतला हृदयाशी संबंधीत कोणत्या तरी आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. आम्ही डॉक्टरांकडून राखीच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेण्यास प्रयत्न करत आहोत. राखी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करुया आणि पुन्हा राखी तिच्या क्रेझी अंदाजात आपल्याला भेटेल अशी अपेक्षा आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.