Rakhi Sawant Relief From Arrest: मनोरंजन विश्वाची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत राहणारी राखी सावंत आता पूर्वपती आदिल खान दुर्रानी याच्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा माजी पती आदिल खान दुर्रानी यांच्यात जोरदार वाद सुरू आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका खासगी व्हिडीओ लीक प्रकरणात अभिनेत्री राखी सावंत हिचे नाव समोर आले होते. त्यानंतर हे प्रकरण पोलिस आणि कोर्टापर्यंत देखील पोहोचल्याने राखीवर अटकेची टांगती तलवार होती. मात्र, आता या अभिनेत्रीला मुंबईच्या सत्र न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे राखी सावंत हिची अटक टळली आहे.
आपले खाजगी व्हिडीओ लीक केल्याचा आरोप आदिल खान दुर्रानी याने राखी सावंत हिच्यावर लावला होता. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू होती. बुधवारी पार पडलेल्या सुनावणीत मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेत्रीला तिच्या माजी पतीने दाखल केलेल्या या प्रकरणात अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे.आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यात वाद झाल्यांनतर आदिलने राखीवर काही गंभीर आरोप केले होते. यातच त्याने आपले खाजगी व्हिडीओ राखीने लीक केले असे म्हणत तिच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरविरोधात आता अभिनेत्रीला बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. अभिनेत्री राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. यापूर्वी राखी सावंत हिने देखील आदिल खानवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. राखीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आदिलला अटक देखील केली होती. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखी विरोधात तक्रार दाखल करत आपले खाजगी व्हिडीओ तिने लीक केले, असे म्हटले होते.
संबंधित बातम्या