Bigg Boss Marathi Day 63 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सेलिब्रिटींपासून नेत्यांपर्यंत आणि गायकांपासून सोशल मीडिया एन्फ्लुएंसर्स सामील झाले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात एकापेक्षा एक सदस्य पाहायला मिळत आहेत. पण काही दिवसांपूर्वी घरातील स्पर्धक निक्की तांबोळी आणि तिच्या टीमने घातलेला गोंधळ पाहून सर्वजण राखी सावंतला हा शोमध्ये पाठवा अशी मागणी करत होते. आता प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण झाली आहे.
कलर्ल मराठी वाहिनीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंतची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळते. सदस्यांना भेटायला त्यांना खास सल्ले द्यायला 'बिग बॉस मराठी'च्या घरात एक खास पाहुणी येणार आहे. ड्रामाक्वीन राखी सावंतची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री होणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की,"राखी सावंतने हॅलो बिग बॉस म्हणत बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे. लाल रंगाचा गाऊन घालून राखी सावंत बिग बॉसच्या घरात आली आहे. घरात येताच बिग बॉसला राखी म्हणतेय, "मी राखी सावंत तुमची पहिली बायको." त्यानंतर राखीची नजर निक्की तांबोळीवर पडते. निक्कीला राखी म्हणतेय, "सस्ती राखी सावंत. आता घरात चालणार माझंच ठणाणा... निक्की तांबोळी सोडून येणार तुला अंबोली."
राखीला पाहताच निक्कीचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे. निक्की बोलण्यात कोणाला ऐकत नाही. त्यामुळे आता राखी सावंतला ती कसं गप्प करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. तसेच 'बिग बॉस मराठी'च्या घरात राखी सावंत आज तिच्या स्टाईलने जबरदस्त कल्ला करताना दिसणार आहे. आता बिग बॉस पाहयला खरी मजा येणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
वाचा: रमेश सिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शन केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा
कोणाचे ही ऐकत नसलेल्या निक्की तांबोळीला धडा शिकवायला राखी सावंत हवी अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. आता त्यांची ही मागणी पूर्ण झाल्यामुळे नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका यूजरने ‘चला आता शेवट तरी गोड होणार’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘राखी शिवाय बिग बॉस पूर्ण होऊच शकत नाही’ असे म्हटले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता आगामी भागाची उत्सुकता वाढली आहे.