मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rakhi Sawant News: ‘ती दुबईत लपून बसली आहे’; आदिल दुर्रानीचे आरोप ऐकताच संतापली राखी सावंत! म्हणाली...

Rakhi Sawant News: ‘ती दुबईत लपून बसली आहे’; आदिल दुर्रानीचे आरोप ऐकताच संतापली राखी सावंत! म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 17, 2024 10:58 AM IST

Rakhi Sawant And Adil Durrani Clashes: ‘राखी दुबईत लपून बसली आहे. जर, ती भारतात परतली तर येत्या २४ तासांत ती तुरुंगात असेल’, असेही आदिलने म्हटले.

आदिल दुर्रानीचे आरोप ऐकताच संतापली राखी सावंत! म्हणाली...
आदिल दुर्रानीचे आरोप ऐकताच संतापली राखी सावंत! म्हणाली...

Rakhi Sawant And Adil Durrani Clashes: बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत सध्या दुबईमध्ये राहत आहे. यावरच आता तिच्या पूर्वपतीने म्हणजेच आदिल खान दुर्रानी याने प्रतिक्रिया देत राखी दुबईत लपून बसल्याचे म्हटले होते. मात्र, आदिल खान दुर्राणीचे हे आरोप ऐकताच राखी सावंत भडकली आहे. राखी सावंत हिचा माजी पती आदिल खान दुर्रानीने सोमी खानशी दुसरे लग्न केले. आदिलने माध्यमांना नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने राखी सावंत हिच्यावर अनेक आरोप केले होते. ‘राखी दुबईत लपून बसली आहे. जर, ती भारतात परतली तर येत्या २४ तासांत ती तुरुंगात असेल’, असेही आदिलने म्हटले. आदिलच्या या वक्तव्यावर राखी सावंत संतापली असून, तिने आदिलला आव्हान दिले आहे.

‘बॉलिवूड बबल’शी बोलताना आदिल दुर्रानीने राखी सावंतवर अनेक आरोप केले आहेत. त्याने दुसरे लग्न का केले, ते देखील यावेळी सांगितले. आदिल म्हणाला, 'राखी फरार आहे, ती गेल्या चार महिन्यांपासून दुबईत आहे. मी तिच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल केले आहेत. ती दुबईत का आहे? माहित आहे का? आम्ही तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ती दुबईत लपून राहिली आहे. जर, राखी सावंत भारतात परतली, तर ती पुढील २४ तासांत तुरुंगात असेल. तिला जामीनही मिळणार नाही. कारण तिच्या विरोधात कलम ६७अ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. न्यायदंडाधिकारी सत्र आणि उच्च न्यायालयानेही राखीची याचिका फेटाळली आहे. राखी सावंतने सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे, पण कोर्टाने त्या अर्जाकडे लक्ष दिलेले नाही.’

राखीला आला आदिलचा राग!

आदिल दुर्रानीचे हे आरोप ऐकून राखी सावंत भडकली आहे. तिने आदिल खान याला 'उद्धट' आणि 'डुक्कर' म्हटले आहे. राखी सावंत म्हणाली की, 'तो माझ्या नावावर आपला उदरनिर्वाह करत आहे. थांबा, मी लवकरच भारतात परतत आहे. तो स्वत:ला मुस्लिम म्हणवतो, चिखलात पडलेला डुक्कर, तू अल्लाहला देखील सोडले नाहीस, रमजानच्या पवित्र महिन्यात तू मीडियामध्ये घाण पसरवत आहेस. तुला काय वाटलं की, तुझ्या नावाने मीडिया तुझ्याजवळ येतो? नाही.. राखी सावंतचं नाव आणखी किती वापरणार?’

लग्न, आरोप अन् अटक...

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी २०२२मध्ये लग्न केले होते. मात्र, काही महिन्यांनंतर अभिनेत्रीने फसवणूक केल्याचा आरोप करत आदिलला तुरुंगात पाठवले होते. २०२३मध्ये पोलिसांनी आदिलला अटक केली होती. जवळपास ५ महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिलला जामीन मिळाला. आता आदिलने ‘बिग बॉस १२’ची स्पर्धक सोमी खानसोबत दुसरे लग्न केले आहे.

IPL_Entry_Point