Rakesh Bapat Upcoming marathi Serial: गेल्या काही दिवसांपासून मराठी मालिका विश्वांमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित नव्या मालिका येताना दिसत आहेत. काही नव्या मालिकांची नावे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत, तर काही मालिकांच्या स्टार कास्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या यादीमधील एक मालिका म्हणजे 'नवरी मिळे हिटलरला.' या मालिकेत अभिनेता राकेश बापट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री वल्लरी विराज राकेशसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आता वल्लरीने राकेशसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा सध्या लीलाचा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्याच निमित्ताने या मालिकेची नायिका वल्लरी विराज हिच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी वल्लरीने आपल्या भूमिका बद्दल सांगितले त्यासोबत प्रोमो शूटचा किस्सा ही ऐकवला. "माझी जेव्हा लीलाच्या भूमिकेसाठी निवड झाली तेव्ही ती एकदम अनपेक्षित होती. मला फोन आला आणि २ दिवसात तू ऑडिशनला ये असं सांगितले. मी जाऊन ऑडिशन दिली आणि ३-४ दिवसात मला फोन आला की माझी निवड झाली आहे. मला वाटलं होत ऑडिशनचे अधिक राऊंड्स होतील पण ते मला म्हणाले आम्हाला आणि चॅनेलला ही तू लीला म्हणून पसंत आहेस. माझा विश्वास बसत नव्हता की पहिल्याच ऑडिशन मध्ये माझी निवड झाली आहे. लीला बद्दल सांगायचे झाले तर ती बहिर्मुख आहे, तशीच माझ्यामध्ये ही लवकर मित्र-मैत्रिणी बनवण्याची कला आहे. जिथे जाईन तिथे मिसळून जाते. पण मला माझ्या जवळच्या लोकांमध्ये राहायला जास्त आवडत" असे वल्लरी म्हणाली.
वाचा: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?
पुढे वल्लरीने राकेश बापट बरोबरची पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. "माझी पहिली भेट त्यांच्यासोबत एका लुक टेस्टसाठी झाली होती. मला टेन्शन तर होतच कारण लीलाचे खूप डायलॉग आहेत आणि त्यात राकेश बापट तुमच्या समोर आहेत तर प्रेशर तर होते कारण केमिस्ट्री मॅच झाली तरच लोकांना मालिका पाहायला आवडेल. पण त्यांना जेव्हा भेटले तेव्हा कळले की ते अतिशय साधे आहेत. आमचे लुक टेस्ट ही छान झाले. लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम मिळत आहे, म्हणून माझी उत्सुकता अजून वाढली आहे. मला तुम्हाला लीलाच्या प्रोमोचा किस्सा सांगायला अवढेल. लीलाच्या प्रोमो मध्ये तुम्हाला तिच्या बद्दल खूप काही गोष्टी कळतील. मी प्रोमो मध्ये दही हंडी फोडली आहे आणि स्कुटी ही चालवली आहे. स्कुटी तर मला चालवता येते पण माझ्यासाठी आव्हानात्मक गोष्ट म्हणजे दही हंडी फोडणे. सर्वात महत्वाचे सांगायचे तर हंडी फोडताना जे माझी मदत करत आहेत ते खरे गोविंदा पथक आहे. प्रचंड उत्साही माहोल होत प्रोमो शूटच. लीला खूप धांदरट आहे पण तिचा उद्देश चांगला आहे, तिला सगळ्यांची मदत करायची असते. तर जशी लीला आहे तसाच तिचा प्रोमोही रंगतदार आहे. जस अभिराम जहागीरदारला पाहून तुम्हाला कळले असेल की तो अतिशय शिस्त प्रिय आहे, तसेच लीलामध्ये तुम्हाला एक दिलखुलास-बिंधास्त मुलगी पाहायला मिळेल" असे वल्लरी म्हणाली.
संबंधित बातम्या