सत्तेची लढाई दाखवणारा नवा कोरा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'खुर्ची' असे या चित्रपटाचे नाव असून १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, चित्रपटावर आक्षेप घेत चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये अडथळे आणले जात होते. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राजकारणात खुर्चीचं किती महत्त्व आहे आणि त्यासाठी काय काय घडू शकतं हे 'खुर्ची' चित्रपटात दाखवण्यात आले आहे. सत्ता, खुर्ची, खून, मारामाऱ्या आणि रक्त या सगळ्याच्या अवतीभोवती फिरणार कथानक आहे. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
वाचा: मिस्ट्री मॅनसोबत दिसली कंगना रणौत, हातहात पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल
श्री अविनाश खोचरे पाटील यांनी चित्रपटाचे निर्माते श्री संतोष हगवणे यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी सदर चित्रपट दिग्दर्शनाचे संपूर्ण काम त्यांनी केले होते, करार असतांना देखील श्री हगवणे ह्यांनी त्यांचे नाव कमी करून स्वतःचे आणि श्री शिव माने ह्यांचे नाव दिग्दर्शक म्हणून लावले. सदर दाव्याच्या कामी श्री संतोष हगवणे हे ऍड अमित राठी ह्यांच्या मार्फ़त न्यायालयात हजर झाले, आणि अविनाश खोचरे पाटील ह्यांचा व संतोष हगवणे ह्यांचा कोणताही करार झाला नसल्याचे तसेच खोचरे पाटील ह्यांनी सदर चित्रपट दिग्दर्शनाचे काम केले नसल्याचे सांगितले.
संबंधित बातम्या