मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे', राजश्री देशपांडेने मांडले स्पष्ट मत

'केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे', राजश्री देशपांडेने मांडले स्पष्ट मत

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 11, 2024 03:20 PM IST

"इंटीमेट सीन टाकावेच लागतात, असं म्हणणारी लोक आळशी असतात", असे वक्तव्य अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी एका मुलाखतीमध्ये केले आहे.

'केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे', राजश्री देशपांडेने मांडले स्पष्ट मत
'केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे', राजश्री देशपांडेने मांडले स्पष्ट मत

नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून यशाच्या शिखरावर पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे राजश्री देशपांडे. ती मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच राजश्रीने एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इंटिमेट सीनवर तिचे स्पष्ट मात मांडले आहे. तिने 'केवळ इंटीमेट सीन दाखवणे हा निव्वळ आळशीपणा आहे' असे म्हटले आहे. राजश्रीच्या या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

राजश्रीने नुकताच 'आरपार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राधिका देशपांडेला "वेबसीरिजमध्ये इंटिमेट सीन्स दाखवावेच लागतात, असे सध्या चित्र आहे. पण सेन्सॉरशिप नसल्यामुळे या गोष्टी असल्याच पाहिजेत असे आजकाल चित्र आहे. त्यामुळे ओटीटीवरचा बराचसा कंटेट आपण घरात बसून तीन पिढ्यांबरोबर एकत्र कधीच नाही बघू शकत" असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राजश्रीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: 'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

इंटीमेट सीनवर स्पष्ट मत

"खरं तर असे नाही आहे. मला वाटते की, हे टाकावच लागते असे जे म्हणतात किंवा करणारे लोक आहेत ते अतिशय आळशी आहेत. एखाद्या संहितेबद्दल बघितले तर त्याची काय गरज आहे? का ते आहे? त्याचा नेमका काय उद्देश आहे? ते जर असेल तर त्याचे समर्थन करायला हवेच का? पण तुम्ही ते sensationalization करण्यासाठी टाकत आहात. तुम्ही ते क्रॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्यासाठी टाकताय, तुम्हाला असे वाटते की हे टाकण्याचे ते चालले म्हणून टाकताय, मग ती लोक काम करत नाहीत. ते लोक शॉर्टकटचा वापर करु पाहत आहेत" असे राजश्री म्हणाली. तिने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाचा: ‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?

अभिनेत्रींकडे कसे पाहावे?

पुढे राजश्री म्हणाली की, "तब्बूचा चित्रपट हिट होतो तेव्हा मला खूप आनंद होतो. शेफाली शहाचा चित्रपट हिट होतो तेव्हाही मला आनंद होतो. विद्या बालनचा चित्रपट हिट होताना मला असे वाटत असते की Wow, ती कधीही दाखवत नाही की माझे पोट सपाट आहे म्हणून. ती दाखवते तिच्या कर्व्ह आणि त्याच्यामध्ये ती स्वत:चे मॅजिक क्रिएट करत असते. ते जास्त हिट व्हायला हवे. म्हणजे लोकांना कळेल की बायका म्हणजे ती फक्त उंचच असायला हवी, तिचे केस नेहमी चांगले असायला पाहिजे, तिचा चेहरा खूप गुळगुळीत असा असायला हवा. खरं तर तिचे पात्र महत्त्वाचे असायला हवे. एक आयुष्य दाखवायला पाहिजे"
वाचा: गेल्या महिनाभरापासून जुई गडकरी आजाराने त्रस्त, तरीही करते शुटिंग; काय झालं नेमकं जाणून घ्या?

IPL_Entry_Point

विभाग