Rajpal Yadav Viral Video : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यात तो रागारावरील नियंत्रण गमवताना दिसला आहे. अभिनेत्याचा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये कथित पत्रकार अभिनेत्याला त्याच्या पुढील चित्रपटाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र, यावेळी ‘भूल भुलैया ३’ मध्ये महत्वाची भूमिका साकारणारा कॉमेडियन अभिनेता खूप चिडलेला दिसत होता. पण तरीही त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि उत्तर दिले की दीड महिन्यात प्रेक्षकांना त्याचा एक चित्रपट मिळेल. यानंतर राजपाल याला त्यांच्या एका वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, तो क्षणभर गप्प राहिला आणि मग त्याने प्रश्न विचारणाऱ्याचा फोन हिसकावला..
या दरम्यान राजपाल यादवने पत्रकाराचा मोबाईल हिसकावून फेकून दिल्याचा दावा देखील केला जात आहे. या व्हिडीओमध्ये रिपोर्टरने विचारलं की, अलिकडेच दिवाळीच्या काही दिवस आधी तुझं एक स्टेटमेंट होतं, ज्यात तू...' मात्र, पत्रकार पुढे काही बोलण्याआधीच अभिनेता मोबाईल कॅमेऱ्यावर हात मारताना दिसला आहे. दिवाळीआधी राजपाल यादवने लोकांना फटाके न फोडण्याचे आवाहन करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यावर त्याला खूप ट्रोलही करण्यात आले होते.
त्यानंतर राजपाल यादवने माफी मागितली आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे सांगितले. राजपाल यादवचा दुसरा व्हिडीओही व्हायरल झाला आहे, ज्यात तो हात जोडून जनतेची माफी मागताना दिसत आहे. दिवाळीच्या एका व्हिडीओवर प्रश्न विचारल्यानंतर राजपाल यादवने मोबाईल कॅमेऱ्याला भिरकावून दिल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. इंटरनेटवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर रिपोर्टरने एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, प्रत्येकजण रागावतो आणि असा आपल्या कॅमेऱ्यात कैद होतो.
या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. आता यावर बोलताना कुणी म्हणत आहे की, की असा प्रश्न विचारायला नको होता, तर कुणी म्हणतंय की, त्यासाठी ते राजपालला दोष देणार नाहीत. असा प्रश्न विनाकारण विचारण्यात आल्याचं बहुतेकांनी एक्स पोस्टवर लिहिलं आहे. राजपाल यादवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला धमाकेदार ओपनिंग मिळाली असून, आता त्याचे पहिले वीकेंड कलेक्शन किती होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या