बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवचे वडील नौरंग यादव यांचे शुक्रवारी निधन झाले. गुरूवारी नौरंग यांना प्रकृती खालावल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी राजपाल हा परदेशात होता. वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे तो तातडीने भारतात आला. त्यानंतर शुक्रवारी राजपालच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर राजपालवर दु:खाच डोंगर कोसळला आहे. त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
राजपालने शुक्रवारी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो हसत वडिलांना मिठी मारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत राजपालने, 'मित्रांनो, आज माझी ऊर्जा, माझी शक्ती, माझ्या आयुष्याचा योद्धा, माझे आदरणीय वडील आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा कायम आपल्यासोबत राहतील. माझे सर्वांवर प्रेम आहे. सर्वांच्या आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद' असे कॅप्शन दिले आहे.
वडिलांना पाकिस्तानकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर काही दिवसांमध्येच वडिलांचा मृत्यू झाला आहे. कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांच्यासह मनोरंजन सृष्टीतील लोकांना धमकीचे मेल पाठवल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी 'विष्णू' नावाच्या व्यक्तीने अभिनेता राजपाल यादवला मेल पाठवल्यानंतर आंबोली पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. या मेलमध्ये अभिनेता, त्याचे कुटुंबीय आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांना इजा पोहोचवण्याची धमकी देण्यात आली आहे.
वाचा: राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास, अजामीनपात्र वॉरंट जारी
"आम्ही तुमच्या अलीकडील हालचालींवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की एक संवेदनशील बाब आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही,' असे सांगत या मेसेजकडे अत्यंत गांभीर्याने आणि गोपनीयतेने पाहण्याचे आवाहन ई-मेलमध्ये करण्यात आले आहे. 'don99284@gmail.com' या मेल आयडीवरून पाठवण्यात आलेला हा मेल पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
संबंधित बातम्या