मोठ्या पडद्यावरील अभिनेता बनणे सोपे नाही. अभिनेता सोडा जेव्हा गोष्ट कॉमेडीची असते तेव्हा अचूक टायमिंग साधण्याची गरज असते. अचूक वेळी विनोद करुन प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे राजपाल यादव. त्याने कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज १५ मार्च रोजी राजपालचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याचा इथपर्यंतचा प्रवास.
९०च्या दशकात राजपालने छोट्या पडद्यावर अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बराच काळानंतर राजपाल चित्रपटात भूमिका साकारु लागला. उत्तर प्रदेशमधील शाहजहापूर पासून ५० किलोमीटर लांब असलेल्या कस्बा या छोट्या गावात १९७१ साली राजपालचा जन्म झाला. शिक्षणात त्याचे मन लागत नव्हते. तो आजूबाजूच्या गावात नाटकं बघण्यासाठी जायचा. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्याने कपड्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.
वाचा: अन् सतीश कौशिक यांची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण
आई-वडीलांचे स्वप्न होते की राजपालने डॉक्टर व्हावे. राजपाल यादवने तेही करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडून ते होणार नाही याचा अंदाज त्याला आला. त्यानंतर राजपालने हिंदी वाड्ंमय केले. १९९२ साली अभिनयाचे धडे घेण्यासाठी दिल्लीसाठी रवाना झाला. १९९७ साली पासआऊट होईन राजपाल यादव मुंबईत आला.
सुरुवातीला राजपालने काही मालिकांमध्ये केले. त्यानंतर १९९९ सालात आलेल्या अजय देवगणच्या ‘शूल’ या सिनेमातून राजपाल यादवने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. दोन दशकांच्या कारकीर्दीत राजपालने विविध भूमिका साकारल्या आहेत. हंगामा, गरम मसाला, मुझसे शादी करोगी, मालामाल विकली, भूलभुलैया, पार्टनर, जुडवा-२ अशा अनेक सिनेमांमधून त्याने कॉमेडी भूमिका केल्या आहेत. तर जंगल, डरना मना है, मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू या प्रकराच्या काही सिनेमांमधून त्याने कॉमेडी न करता काहिशा हटके भूमिका साकारल्या आहेत.
संबंधित बातम्या