कार्तिक आर्यनचा 'प्यार का पंचनामा २' हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सोनाली सहगल, इशिता राज शर्मा, ओमकार कपूर आणि सनी सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की राजकुमार रावची पत्नी पत्रलेखानेही या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. पत्रलेखाने नुकतीच एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. तिने सांगितले की, ऑडिशननंतर लव रंजनने तिला फोन केला आणि तिला ऑफिसमध्ये बोलावले होते. त्यानंतर त्याने तिची निवड झाली नसल्याचे सांगितले.
पत्रलेखाने नुकतीच मॅशेबल इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे. पत्रलेखा म्हणाली की, तिने या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. पण तिला ही भूमिका मिळू शकली नाही. "'सिटी लाइट्स'पूर्वी मी 'प्यार का पंचनामा २'साठी ऑडिशन दिली होती. लव सर ऑडिशन घेत होते आणि त्यांच्या ऑडिशन्स नेहमीच मोठ्या असतात. नुसरत, कार्तिक, ओंकार, सनी आणि इतर काही लोक तेथे होते. यातील तीन-चार मुलींना ही भूमिका मिळाली होती आणि त्यांना आणखी दोन नवे चेहरे हवे होते. मी ऑडिशन दिली आणि मला वाटले की मला ही भूमिका मिळाली आहे" असे पत्रलेखा म्हणाली.
पत्रलेखाला ही भूमिका मिळेल अशी आशा होती. ती जिममध्ये असताना तिला अचानक फोन आला. "मी जिममध्ये होते आणि लव रंजनने मला फोन केला. रोल मिळाल्यावर फोन येतो. त्याने मला त्याच्या घरी बोलावलं आणि मी खूप खूश झाले होते. मी आंघोळ केली, माझे सर्वोत्तम कपडे घातले आणि त्याच्या ऑफिसकडे निघाले" असे पत्रलेखा म्हणाली.
त्याने मला बसायला सांगितलं आणि तिथे कोणीच नव्हतं. माझ्या मनात होतं की तो आता मला गुड न्यूज देईल आणि मग लोक माझ्यासाठी फुले, चॉकलेट आणि केक आणतील. तो म्हणाला, 'यार, जाऊ दे.' त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. मी विचार केला की तो मला फोन करून बोलावून घेतो आणि माझ्या तोंडावर नाही कसा म्हणू शकतो. ते अजिबात योग्य नव्हते.
वाचा: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते
मात्र संभाषणादरम्यान पत्रलेखाने लव रंजनचे कौतुक केले. त्यानंतर लव रंजन यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि म्हणाले, 'बेटा नहीं हो पाया, पर हम आगे काम करेंगे.' त्यामुळेच मला कदाचित वाइल्ड-वाइल्ड पंजाब हा सिनेमा मिळाला.'
संबंधित बातम्या