अंध उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित 'श्रीकांत' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसत आहे. १० मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. पण आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. जवळपास १० फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर राजकुमारचा 'श्रीकांत' हा चित्रपट हिट ठरताना दिसत आहे. आता या चित्रपटाने चौथ्या दिवशी किती कमाई केली चला जाणून घेऊया...
२०२४ हे वर्षे राजकुमार रावसाठी खास ठरले आहे. 'श्रीकांत' या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. त्याच्या भूमिकेचे सर्वजण कौतुक करताना दिसतात. आता या चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेऊया...
वाचा: 'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर
'श्रीकांत' या चित्रपटाने १० मे म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.२५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४.२ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या चित्रपटाच्या कमाईत २५ टक्के वाढ झाली. चित्रपटाने जवळपास ५.२५ कोटी रुपये कमावले. त्यानंतर चौथ्या दिवशी १.७५ कोटी रुपये कमावाले. ही आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे. 'श्रीकांत' चित्रपटाने एकूण १३.४५ कोटी रुपये कमावले आहेत.
वाचा: विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी
'श्रीकांत' या चित्रपटाचे बजेट हे ४० कोटी रुपये आहे. पण चित्रपटाची कमाई पाहाता चित्रपट अर्धे पैसे देखील वसूल करु शकेल की नाही याविषयी खात्री नाही. त्यामुळे येत्या काळात चित्रपट किती रुपये कमावते हे पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
गेल्या सहा वर्षात राजकुमार रावने एकही हिट चित्रपट दिलेला नाही. जवळपास १० फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर 'श्रीकांत' हा जरा बरी कमाई करताना दिसत आहे. यापूर्वी जजमेंट है क्या, मेड इन इंडिया, शिमला मिर्च, ५ वेडिंग्स, रुही, बधाई दो, हिट आणि भीड हे राजकुमारचे चित्रपट फ्लॉप होताना दिसले. आता 'श्रीकांत' किती कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.