विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी-rajkummar rao srikanth movie box office collection day 3 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

Aarti Vilas Borade HT Marathi
May 13, 2024 11:51 AM IST

'श्रीकांत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या चित्रपटात अंधळा उद्योगपती श्रीकांत बोलाची कथा दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाने तीन दिवसात किती कमावले जाणून घेऊया..

 'श्रीकांत' चित्रपटाची तीन दिवसाची कमाई
'श्रीकांत' चित्रपटाची तीन दिवसाची कमाई

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'श्रीकांत' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. १० मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा समीक्षकांनी सकारात्मक रिव्ह्यू दिला. पुन्हा एकदा राजकुमार रावच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. उद्योगपती आंधळ्या श्रीकांतची खरी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ओपनिंग डेला सर्वात कमी कमाई

राजकुमार राव आणि ज्योतिका हे कलाकार मुख्य भूमिकेत असणारा 'श्रीकांत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या चित्रपटात उद्योगपती श्रीकांत बोलाची भूमिका राजकुमार रावने निभावली आहे. चित्रपटातील राजकुमारचा अभिनय पाहाता सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. अनेकजण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. ओपनिंग डेच्या दिवशी चित्रपटाने अगदीच कमी कमाई केली होती. चित्रपटाने केवळ २.२५ कोटी रुपयांचा पल्ला गाठला होता. आता चित्रपटाच्या कमाईमध्ये चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ

Sacnilk ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे. शुक्रवार पेक्षा विकेंडची चित्रपटाची कमाई डबल आहे. शनिवारी चित्रपटाने केवळ ४ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने ५. ५० कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत चित्रपटाने एकूण ११.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची सुरुवात जरी हळू झाली असली तरी आता चित्रपट रुळावर येत असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी १२वी फेल, लापता लेडीज, मडगाव एक्सप्रेस आणि स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटांनी देखील अशीच कमाई केली होती. पण नंतर हे हळूहळू चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यामुळे येत्या काळात चित्रपट किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: 'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

राजकुमारच्या आगामी चित्रपटाविषयी

राजकुमार रावसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री ज्योतिका भूमिका साकारत आहे. तिचा 'श्रीकांत' सिनेमातील अभिनय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्योतिका बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देत आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटाशिवाय राजकुमार राव अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पार पडला.

विभाग