बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ-rajkummar rao shrikant movie box office collection day 2 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

Aarti Vilas Borade HT Marathi
May 12, 2024 09:00 AM IST

दिग्दर्शक तुषार हसनंदानी यांचा 'श्रीकांत' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. शनिवारी या चित्रपटाने किती कमाई केली? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

राजकुमार रावचा 'श्रीकांत' हा चित्रपट चांगली कमाई करत आहे
राजकुमार रावचा 'श्रीकांत' हा चित्रपट चांगली कमाई करत आहे

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'श्रीकांत' हा चित्रपट १० मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा समीक्षकांनी सकारात्मक रिव्ह्यू दिला. पुन्हा एकदा राजकुमार रावच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आंधळ्या श्रीकांतची खरी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

'श्रीकांत'ची दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई

राजकुमार राव आणि ज्योतिकाचा 'श्रीकांत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या चित्रपटात उद्योगपती श्रीकांत बोलाची भूमिका राजकुमार रावने साकारली आहे. चित्रपटातील राजकुमारचा अभिनय पाहाता सर्वजण चकीत होत आहेत. अनेकजण त्याची प्रशंसा करताना दिसत आहेत. ओपनिंग डेच्या दिवशी चित्रपटाने फारशी कमाई केली नव्हती. चित्रपटाने केवळ २.२५ कोटी रुपये कमावले होते. आता चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: प्रत्येक 'चौका'तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?

दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ

Sacnilk ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, शनिवारी चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे. शुक्रवार पेक्षा शनिवारी चित्रपटाने डबल कमाई केली आहे. शनिवारी चित्रपटाने ४ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत चित्रपटाने एकूण ६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही चित्रपटासाठी चांगली सुरुवात समजली जात आहे. तसेच येत्या काळात चित्रपट चांगली कमाई करु शकतो असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. यापूर्वी १२वी फेल, लापता लेडीज, मडगाव एक्सप्रेस आणि स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटांनी देखील पहिल्या दिवशी फारशी कमाई केली नव्हती. पण नंतर हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यामुळे येत्या काळात चित्रपटाच्या कमाई विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई

राजकुमारच्या आगामी चित्रपटाविषयी

राजकुमार रावसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकाचा 'श्रीकांत' सिनेमातील अभिनय प्रशंसाजनक आहे. ज्योतिका एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडमध्ये देताना दिसत आहे. तुषार हीरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात आलया एफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाशिवाय राजकुमार राव अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसणार आहे.
वाचा: “लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, केतकी चितळेची संतप्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

विभाग