क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित-rajkummar rao and janhvi kapoor upcoming movie mr and mrs mahi trailer is out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
May 13, 2024 08:30 AM IST

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत असणारा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात क्रिकेट वेड्या कपलची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तसेच त्यांचा रोमॅन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जान्हवी आणि राजकुमार यांची भट्टी जमलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

क्रिकेटच्या मैदानापासूनचा एक भावनिक प्रवास

स्वप्न आणि कर्तव्य यांच्या ओझ्याखाली दबलेल्या अभिनेत्यांची कहाणी आजवर अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. पण अशी स्वप्ने जी आपल्या पत्नीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ही नवी कथा 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये राजकुमार रावचा जन्म अशा कुटुंबामध्ये झालेला दाखवण्यात आला आहे जिथे स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा कुटुंबाची जबाबदारी जास्त महत्त्वाची आहे. वडिलांच्या सांगण्यावरुन राजकुमार ही तडजोड करतो. काही दिवसांनंतर त्याच्या आयुष्यात त्याची पत्नी मिसेस माही म्हणजेच जान्हवीची एण्ट्री होते. ती जबरदस्त क्रिकेट खेळत असते. दोघांची जोडी एकदम परफेक्ट असते. पण नंतर काही कारणास्तव त्यांच्यामध्ये वाद सुरु होतात.
वाचा: 'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या पत्नीचा खेळ पाहून पत्नीला योग्य ते मार्गदर्शन देण्याचा निर्णय राजकुमार राव घेतो. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्ने पत्नीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय तो घेतो. पण समाज, कुटुंबीय, विचार अशा अनेक गोष्टी त्यांच्या या प्रवासाच्या आड येतात. आता राजकुमारचे स्वप्न पूर्ण होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

कधी होणार चित्रपट प्रदर्शित

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यापूर्वी रुही चित्रपटात एकत्र दिसले होते. हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला हवा तसा रिसपॉन्स मिळाला नाही. पण ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. आता 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात पुन्हा ते एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, जरीन वहाब हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
वाचा: बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

Whats_app_banner