कधीकाळी मित्रांकडून उसने पैसे घ्यायचा राजकुमार राव, आता आहे कोट्यवधींचा मालक
राजकुमार राव हा बॉलिवूडमध्ये फार प्रसिद्ध आणि गुणी अभिनेता आहे. त्याला चित्रपटांत काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता.
प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव याने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलेलं आहे. त्याने 'स्त्री', 'शादी मे जरुर आना', आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या सुपरहिट चित्रपटांतून चाहत्यांवर आपली छाप पाडली. परंतु त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. त्याच्याकडे पैसे नसायचे तेव्हा तो मित्रांकडून उसनवारी पैसे घेऊन दिवस काढायचा. परंतु आता त्याची वेळ आणि परिस्थिती बदलली आहे. आता राजकुमार कोट्यधीश झालेला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एका मुलखतीत राजकुमारने त्याचा संघर्ष आणि त्या मुंबईतील दिवसांचे किस्से सांगितले होते. त्यात तो म्हणाला होता की 'जेव्हा मी मुंबईत आलो होतो तेव्हा एका खूप छोट्या खोलीत रहायचो, माझ्याकडे पैसे नव्हते, एकदा मला मोबाइलवर मेसेज आला की बँकेच्या अकाउंटमध्ये फक्त 18 रुपये आहेत आणि त्याचवेळी माझ्या मित्राकडेही फक्त 23 रुपये होते'. राजकुमार हा 'एफटीआयआय' चा विद्यार्थी असल्याने त्याचं फ्रेंड सर्कल मोठं होतं. त्यामुळे त्याला संकटकाळात अनेक मित्रांनी आर्थिक मदत केली होती.
परंतु आता राजकुमार बॉलिवूडमधील कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेला अभिनेता आहे. त्याच्याकडे मुंबईत स्वतःच्या मालकीचं घरदेखील आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे महागड्या गाड्याही आहेत. राजकुमार राव ला 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाने ओळख दिली. तर त्याचा 'शादी मे जरुर आना' हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यामुळे राजकुमार रातोरात अभिनेता झाला. सध्या बॉलिवूडमध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.