मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi
May 16, 2024 09:15 AM IST

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा 'श्रीकांत' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे. आता सहाव्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊया...

राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची कमाई
राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची कमाई

हैदराबादमधील अंध उद्योगपती श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित 'श्रीकांत' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव, आल्या एफ, ज्योतिका हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहे. १० मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई करताना दिसत आहे. आता सहाव्या दिवशी चित्रपटाने किती रुपयांची कमाई केली आहे हे जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

'श्रीकांत' चित्रपटाच्या कमाईविषयी

'श्रीकांत' या चित्रपटाने १० मे म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फारशी कमाई केली नव्हती. या चित्रपटाने केवळ २.२५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच विकेंडला चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४.२ कोटी तर तिसऱ्या दिवशी ५ कोटी रुपयांची कमाई केली. आता समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी चित्रपटाने केवळ १.५० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने आतापर्यंत १६.४५ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. ही कमाई फारच कमी असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितशी लग्न करण्यास दिला होता नकार, जाणून घ्या काय होते कारण?

पहिल्या दिवशी- २.२५ कोटी रुपये

दुसऱ्या दिवशी- ४.२ कोटी रुपये

तिसऱ्या दिवशी-५.२५ कोटी रुपये

चौथ्या दिवशी- १.६५ कोटी रुपये

पाचव्या दिवशी-१.६ कोटी रुपये

सहव्या दिवशी- १.५० कोटी रुपये

आता पर्यंत चित्रपटाने एकूण १६.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: मराठमोळ्या सोनालीला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर करणार होता प्रपोज पण...

'श्रीकांत' चित्रपटाचे बजेट

'श्रीकांत' या चित्रपटाचे बजेट हे जवळपास ४० कोटी रुपये आहे. पण चित्रपटाची कमाई पाहाता चित्रपट अर्धे पैसे देखील वसूल करु शकेल की नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे येत्या काळात चित्रपट किती रुपये कमावते हे पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

राजकुमारचे १० फ्लॉप सिनेमे

गेल्या सहा वर्षात राजकुमार रावने एकही हिट असा चित्रपट दिलेला नाही. जवळपास १० फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर 'श्रीकांत' हा जरा बरी कमाई करताना सुरुवातीला दिसत होता. यापूर्वी जजमेंट है क्या, मेड इन इंडिया, शिमला मिर्च, ५ वेडिंग्स, रुही, बधाई दो, हिट आणि भीड हे राजकुमारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करु शकले नाही. आता 'श्रीकांत'च्या किती कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग