काही मोजकेच चित्रपट करुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा दिग्दर्शक म्हणजे राजकुमार हिराणी. वर्षा दोन वर्षातून राजकुमार हिराणी हे एखादा चित्रपट दिग्दर्शित करताना दिसतो. त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट होताना दिसतो. आज २२ नोव्हेंबर रोजी राजकुमार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सुपरहिट चित्रपटातील काही डायलॉग आठवू या...
२००३ साली प्रदर्शित झालेला 'मुन्ना भाई एम बी बीएस' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील 'ए मामू... जादू की झप्पी देदे और खतम कर...' हा डायलॉग तुफान हिट ठरला होता. तसेच 'लाईफ में जब टाईम कम रहेगा तो डबल जिनेका' हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
वाचा: 'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये साहेबरावांची होणार एण्ट्री, मालिकेत रंजक वळण
राजकुमार हिराणी आणि आमिर खानने २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पीके' चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील 'शादी ब्याह में पटाखे फोडके बँड बाजा बजाके... काहे पुरे शेहेर को बताया जाता है की आज I Am Having Sex' हा डायलॉग आजही सर्वांच्या लक्षात आहे.
२००९ साली प्रदर्शित झालेला थ्री इडिएट्स हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहाताना दिसतात. या चित्रपटातील 'बच्चे काबिल बनो, काबिल... कामयाबी तो साली झक मारके पीछे भागेगी' हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडून निघताना दिसतो. त्यासोबतच 'दोस्ती फेल हो जाए तो दुख नहीं होता.. लेकिन दोस्त फस्ट आए तो ज्यादा दुख होता है' हा डायलॉग सर्वांना आठवतो.
सध्या हिराणी हे त्यांचा आगामी चित्रपट 'डंकी'च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते जवळपास चार-साडेचार वर्षांनी दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नाताळच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या