Dunki Review: कसा आहे शाहरुख खानचा 'डंकी' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dunki Review: कसा आहे शाहरुख खानचा 'डंकी' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

Dunki Review: कसा आहे शाहरुख खानचा 'डंकी' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 21, 2023 03:19 PM IST

Shah Rukh Khan Starrer Dunki Movie Review: नुकताच अभिनेता शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Shah Rukh Khan Starrer Dunki
Shah Rukh Khan Starrer Dunki

दिग्दर्शक राजकुमार हिराणी दिग्दर्शिक 'डंकी' या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. आज २१ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत आहे. यंदाच्या वर्षातला शाहरुखचा हा तिसरा चित्रपट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाची कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

डंकी चित्रपटात पंजाबमधील एका गावात राहणाऱ्या काही मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. या मित्रांना लंडनला जायचे असते जणे करुन तिथे गेल्यावर गरीबी मिटेल अशी त्यांची भावना असते. त्यापैकी एका मित्राला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला घेऊन जायचे असते. कारण ती तिच्या पतीच्या जाचाला कंटाळलेली असते. तिचा पती तिला सतत मारहाण करत असतो. सगळेजण IELTSच्या परीक्षेची तयारी करतात. पण त्यापैकी एकालाही इंग्रजी येत नसते. त्यानंतर हे सगळेजण एक वेगळा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करतात. ते डंकी फ्लाइट म्हणजेच अवैध पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात. आता पुढे ते खरच लंडनमध्ये पोहोचले आहेत का? त्यांच्या प्रवासात काय काय अडथळे आले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
वाचा: २०२४मध्ये शिवानी सुर्वे अडकणार लग्नबंधनात? व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण

'डंकी' चित्रपटातील शाहरुखचे डायलॉगने हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. हा चित्रपट पाहिल्यावर सर्व कलाकारा राजकुमार हिराणी यांच्यासोबत काम करण्यासाठी का उत्सुक असतात याची प्रचिती होते. डंकी हा चित्रपट सुरुवातीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. कधी या चित्रपटातील संवाद प्रेक्षकांना हसवतात तर कधी रडवतात. चित्रपटात तरुणपणीचा शाहरुख आणि म्हातारपणीचा शाहरुख दाखवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या दोन्ही भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेतात. शाहरुख शिवाय इतर कलाकारांचा अभिनय देखील पाहण्यासारखा आहे. शाहरुख आणि तापसीची जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विकी कौशलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो कोणतीही भूमिका साकारत असला तरी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतो. चित्रपटातील सगळ्यात आकर्षक पात्र म्हणजे अभिनेते विक्रम कोच्चर यांचे. त्यांची भूमिका इतरांपेक्षा वेगळी आहे.

'डंकी' चित्रपटातील राजकुमार हिराणी यांचे दिग्दर्शन हे भन्नाट आहे. ते कायमच त्यांच्या कथा सांगण्याच्या पद्धतीने सर्वांची मने जिंकत असतात. त्यात डंकी हा चित्रपट अॅड झाला आहे. चित्रपटातील प्रीतमचे संगीत सर्वांना भावते आणि काही सीनमध्ये डोळ्यात अक्षरश: डोक्यात पाणी येते.

Whats_app_banner