मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रजनीकांतचा आगामी चित्रपट 'जेलर'चा पोस्टर रिलीज

रजनीकांतचा आगामी चित्रपट 'जेलर'चा पोस्टर रिलीज

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jun 17, 2022 07:03 PM IST

सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, त्याचा पोस्टर रिलीज झाला आहे.

रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’चा पोस्टर
रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’चा पोस्टर

सुपरस्टार रजनीकांत यांच्या पुढील चित्रपटाची प्रतिक्षा संपली असून, शुक्रवारी निर्मात्यांनी त्याच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'जेलर' असून, हा रजनीकांत यांचा १६९ वा प्रोजेक्ट असणार आहे.

निर्मात्यांनी फिल्मच्या पोस्टर द्वारे चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टरमध्ये फॅक्ट्रीसारख्या सेटिंगमध्ये साखळीने टांगलेल्या रक्ताचे डाग असलेले मीट क्लीव्हर दिसत आहे. यावरून हा चित्रपट भयानक अॅक्शन फ्लिक असणार असे दिसते. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार आणि रजनीकांत यांचा हा एकत्र काम करत असलेला हा पहिला चित्रपट आहे.

सुपरस्टार रजनीकांतची मोठ्या पडद्यावरील पुनरागमनाची वाट पाहणाऱ्यांसाठी ही घोषणा म्हणजे आनंदाची अपडेट आहे. २०२१ मध्ये आलेल्या अन्नत्थेमध्ये तो दिसला होता. त्यानंतर ऑनस्क्रीन रजनीकांत दिसला नाही. ऑफस्क्रीन तो नुकत्याच झालेल्या नयनतारा आणि विघ्नेश शिवनच्या लग्नात दिसला होता. जेलर हा चित्रपट रजनीकांतचा १६९ वा प्रोजेक्ट असणार आहे. सध्या ते #Thalaivar169 या हॅशटॅगने चर्चेत असलेले दिसून येते.

IPL_Entry_Point

विभाग