रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!

रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!

Jan 18, 2025 05:11 PM IST

Bollywood Nostalgia Kissa : सिनेसृष्टीत काही कलाकार त्यांच्या अभिनयासाठी तर काही त्यांच्या सिग्नेचर स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुपरस्टार रजनीकांत!

रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!
रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!

Bollywood Nostalgia : सिनेसृष्टीत काही कलाकार त्यांच्या अभिनयासाठी तर काही त्यांच्या सिग्नेचर स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुपरस्टार रजनीकांत, ज्यांना मनोरंजन विश्वाचे थलायवा देखील म्हटले जाते. वयाच्या ७४व्या वर्षीही त्यांच्या आयकॉनिक शैलीशी कोणीही बरोबरी करू शकत नाही.

रजनीकांत यांनी ही शैली कोणाकडून शिकली?

रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला की, तो हिट होतो. कारण, रजनीकांत यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. चाहतेही त्यांची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. रजनीकांत यांची स्वतःची अशी एक वेगळी स्टाईल आहे. मग ती चष्मा फेकण्याची असो वा सिगारेट पकडून फेकण्याची स्टाईल अतिशय वेगळी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, रजनीकांत यांनी ही सिगारेट फेकण्याची ही पद्धत एका बॉलिवूड अभिनेत्याकडून शिकली होती?

महाराष्ट्राचे 'लाडके भावोजी' कधी काळी विकायचे नारळ! वाचा आदेश बांदेकर यांच्याविषयी माहीत नसेलेल्या ५ गोष्टी

कोण होता हा अभिनेता?

२०१८मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रजनीकांत म्हणाले होते की, त्यांनी पडद्यावर दाखवलेल्या सिग्नेचर ट्रिक्स त्यांच्या स्वत:च्या नसून इतर कोणत्यातरी अभिनेत्याकडून प्रेरित होत्या. रजनीकांत म्हणाले की, त्यांनी बॉलिवूडच्या एक अभिनेत्याला सिगारेट हवेत फेकताना पाहिले होते. त्यांनी त्यामध्ये काही बदल करून स्वतःचे नवीन व्हर्जन बनवले. यानंतर रजनीकांत यांनी आरशासमोर त्याचा सराव केला. याचा किस्सा सांगताना तो म्हणाला, 'हिंदी चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा हे पहिलेच होते, ज्यांनी अशी सिगारेटची हटके स्टाईल क्रिएट केली होती. मी त्यांनाच पाहिलं आणि मी त्यात काही सुधारणा केलया. हे एक कौशल्य आहे पण, त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळ. बारीक लक्ष देण्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला ती योग्य वेळी फ्लिक करावे लागते.'

रजनीकांत पुढे म्हणाले की, त्यांनी सिगारेट फेकली आणि लगेच पकडली असे नाही. त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. शूटिंग दरम्यान डायलॉग्स बोलावे लागतात आणि त्यादरम्यान फेकलेली सिगारेट लगेच पकडावी लागते. 'जेलर २'च्या माध्यमातून रजनीकांत लवकरच चित्रपटाच्या पडद्यावर परतणार आहेत. 'जेलर'चा पहिला भाग २०२३मध्ये १० ऑगस्ट रोजी लाँच झाला होता. या चित्रपटाचे नेट इंडिया कलेक्शन ३४३.७२ कोटी रुपये होते.

Whats_app_banner