अभिनेते कमल हासन आणि अभिनेते रजनीकांत हे दोघेही साऊथचे मोठे सुपरस्टार आहेत. दोघांनीही आपल्या कारकिर्दीत अनेक जबरदस्त हिट चित्रपट दिले आहेत. रजनीकांत आणि कमल यांनी एकत्र काम करून ४० वर्षे झाली आहेत. सुरुवातीला या दोघांनी काही चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यानंतर ते कधीच एकत्र दिसले नाहीत. आता अखेर कमलने रजनीकांतसोबत ४० वर्षांत काम का केले नाही हे सांगितले आहे.
कमल हासन यांनी नुकताच इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना रजनीकांत यांच्यासोबत काम करण्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा कमल हासन म्हणाले, "हे काही नवीन कॉम्बिनेशन नसेल. आम्ही यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यानंतर आम्ही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांचे स्पर्धक नाही. आमचे मार्गदर्शकही एकच आहेत. तमिळ चित्रपट निर्माते के. बालचंदर हे आमच्या दोघांचेही मार्गदर्शक आहेत. इतर ठिकाणांसारखे आमच्याकडे खुलेआम स्पर्धा वैगरे नाही किंवा आमच्यामध्ये कोणतेही वैर नाही, फक्त २ वेगवेगळे मार्ग आहेत."
वाचा: अशोक सराफ यांचा अनोखा लूक, 'लाईफलाईन' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
पुढे कमल हासन म्हणाले की, "आम्ही कधीही एकमेकांबद्दल कोणतीही नकारात्मक टिप्पणी केली नाही. वयाच्या विसाव्या वर्षी आम्ही हा निर्णय घेतला होता. आता ४० वर्षानंतर ही आम्ही या निर्णयावर ठाम आहोत."
वाचा: डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात 'हे' हिंदी चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
कमल हासन यांचा 'इंडियन २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इंडियन २'च्या हिंदी ट्रेलर लाँचप्रसंगी कमलने हिंदी प्रेक्षकांचे आभार मानले. कमलने १९८१ साली 'एक दूजे के लिए' या चित्रपटाद्वारे हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. याविषयी बोलताना ते म्हणाले, "सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो. मला वाटले की मी तामिळनाडूचा आहे आणि ही माझी जागा नाही. मी भारतीय आहे, असे तुम्ही मला ३५ वर्षांपूर्वी किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी सांगितले. मी फक्त दक्षिण भारतीय अभिनेता होतो. पण तुम्ही मला भारतीय अभिनेता म्हणून स्वीकारले. त्यामुळे मी कायमच तुमचा आभारी आहे."
वाचा: १२ वर्षांचं प्रेम आणि वाचवायला फक्त ५ तास, 'विषय हार्ड'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
संबंधित बातम्या