'बिग बॉस हिंदी'ची सुरुवात २००६ साली झाली. या पहिल्यावहिल्या सिझनचे अभिनेता अर्शद वारसीने सूत्रसंचालन केले होते. तसेच बिग बॉस हिंदीच्या पहिल्या सिझनचा अभिनेता राहुल रॉय विजेता ठरला. त्यानंतर शोचा होस्ट बदलण्यात आला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. शिल्पा शेट्टीने होस्ट केलेल्या या सीझनचा विजेता आशुतोष कौशिक होता. 'बिग बॉस ३'साठी निर्मात्यांनी बॉलिवूडच्या एका सुपरस्टारशी संपर्क साधला होता. पण या सुपरस्टारने ही ऑफर नाकारली. आता हा सुपरस्टार कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते राजेश खन्ना होते. २०१२मध्ये रेडिफने प्रसिद्ध केलेल्या एका लेखात, जेव्हा राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा पत्रकार अली पीटर जॉन यांनी त्यांचा व राजेश खन्ना यांचा एक किस्सा सांगण्यात आला होता. राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली असताना त्यांना बिग बॉसची ऑफर आली होती. तरी देखील त्यांनी ही ऑफर नाकारली होती.
'निर्मात्यांनी मला फोन केला आणि सांगितले की, राजेश खन्ना यांनी बिग बॉसच्या घरात यावे अशी त्यांची इच्छा आहे. मी राजेश खन्ना यांना विचारले असता ते म्हणाले, "नाही, नाही, राजेश खन्ना अशा शोमध्ये काम करणार नाहीत. मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. कलर्सच्या लोकांनी मला सांगितले की ते त्याला प्रत्येक एपिसोडसाठी 3.5 कोटी देण्यास तयार आहेत, परंतु तरीही त्यांनी नकार दिला. काही दिवसांनी त्यांनी मला फोन केला आणि सांगितले की ते शो करण्यासाठी तयार आहेत. परंतु तोपर्यंत कलर्सने राजेश खन्ना यांच्यामधील रस गमावला होता. त्यामुळे नंतर राजेश खन्ना यांनी दिलेली ऑफर कलर्सने नाकारली.
वाचा: 'तारक मेहता'मधील ‘हा’ कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात? नाव ऐकून व्हाल चकीत
निर्मात्यांनी राजेश खन्ना यांचे कथित प्रतिस्पर्धी अमिताभ बच्चन यांना बिग बॉसचे होस्ट म्हणून साइन केले. अमिताभ बच्चन यांनी 'बिग बॉस ३' होस्ट केला आणि त्यानंतर 'बिग बॉस ४'चे सूत्रसंचालन सलमान खानने केले. आता १४ वर्षे उलटून गेली आणि सलमान खान अजूनही या रिअॅलिटी शोची धुरा सांभाळत आहे.