Rajesh Khanna : सुपरस्टार असूनही 'या' दिग्दर्शकासोबत काम करू शकले नाहीत राजेश खन्ना, कारण वाचून बसेल धक्का
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajesh Khanna : सुपरस्टार असूनही 'या' दिग्दर्शकासोबत काम करू शकले नाहीत राजेश खन्ना, कारण वाचून बसेल धक्का

Rajesh Khanna : सुपरस्टार असूनही 'या' दिग्दर्शकासोबत काम करू शकले नाहीत राजेश खन्ना, कारण वाचून बसेल धक्का

Dec 29, 2024 11:05 AM IST

Rajesh Khanna Birth Anniversary In Marathi: राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने एक काळ गाजवला आहे. त्यांचा अभिनय अनेकांच्या काळजाला हात घालत असे. त्याकाळात त्यांना सिनेमात घेण्यासाठी अनेक दिग्दर्शक लाईन लावत असत.

Rajesh Khanna Birthday
Rajesh Khanna Birthday

Which director could Rajesh Khanna not work with in Marathi:  बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून अभिनेता राजेश खन्ना यांना ओळखले जाते. त्यांचा स्टारडम पाहून भले भले चकित होत असत. सर्वसामान्य मुलीच नव्हे तर अनेक अभिनेत्रीसुद्धा पाहताच त्यांच्या प्रेमात पडत असत. राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाने एक काळ गाजवला आहे. त्यांचा अभिनय अनेकांच्या काळजाला हात घालत असे. त्याकाळात त्यांना सिनेमात घेण्यासाठी अनेक दिग्दर्शक लाईन लावत असत. प्रत्येकालाच त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असायची. पण असे असूनही काही दिगदर्शक असे आहेत ज्यांच्यासोबत काम करण्याची संधी राजेश खन्ना यांना मिळाली नाही. आज राजेश खन्ना यांच्या बर्थ ऍनीव्हर्सरीनिमित्त आपण याबाबतच एक किस्सा जाणून घेणार आहोत.

अभिनेते राजेश खन्ना, त्यांची अफाट लोकप्रियता असूनही, अनेक प्रख्यात दिग्दर्शकांसोबत काम करू शकले नाहीत, ही खंत त्यांनी आयुष्यभर बाळगली असावी. याबद्दल अधिक बोलताना चित्रपट इतिहासकार दिलीप ठाकूर म्हणाले, "राजेश खन्ना यांनी अनेक बड्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले, पण जवळपास चार दिग्दर्शक असे आहेत ज्यांच्यासोबत त्यांना ७० आणि ८० च्या दशकात काम करण्याची संधी मिळाली नाही.

दिग्दर्शक 'राज कपूर'-

ते पुढे म्हणाले, "खूप कमी लोकांना माहित आहे की 'सत्यम शिवम सुंदरम'मधील मुख्य भूमिकेसाठी राजेश खन्ना यांना पहिली पसंती देण्यात आली होती. परंतु शशी कपूर आणि शम्मी कपूर यांनी यावर आक्षेप घेतला. याचे एक कारण म्हणजे राजेश खन्ना यांनी ‘बंडलबाज’च्या निर्मितीदरम्यान शम्मी कपूर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शम्मी कपूर यांनी राज कपूर यांना सांगितले की, मला ते आरकेच्या कोणत्याही चित्रपटात नको आहेत , नंतर राजेश खन्ना यांना मीडियाकडून चित्रपटातून बाहेर पडल्याची माहिती मिळाली आणि ते संतप्त झाले. अखेरीस, त्यांची पत्नी डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांना ऋषी कपूर दिग्दर्शित आरके चित्रपट साइन करण्याची विनंती केली होती. त्यांनतर राजेश खन्ना यांनी 'आ अब लौट चले'मध्ये काम केले होते.

राजेश खन्ना यांनी प्रकाश मेहरा यांच्यासोबतही काम करण्याची संधी गमावली. याबाबत बोलताना ठाकूर सांगतात की, १९८९ मधील"जादुगरच्या पहिल्या जाहिरातीत राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आणि झीनत अमान होते. पण नंतर ते रद्द करण्यात आले आणि नंतर प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांना साइन केले आणि त्यांच्यासोबत चित्रपट बनवला." राजेश खन्ना यांना सुभाष घई यांच्यासोबतही काम करता आले नाही. ठाकूर म्हणाले, "सुभाष घई यांनी आराधना चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांच्या मुलाचा मित्र म्हणून काम केले होते, परंतु या दोघांनीही अभिनेता-दिग्दर्शक म्हणून काम केले नव्हते. राजेश खन्ना ज्यांच्यासोबत काम करू शकले नाहीत असे आणखी एक चित्रपट निर्माते म्हणजे गुलजार होय.

Whats_app_banner