मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raja Rani: ‘राजाराणी’ची थरारक प्रेमकहाणी! हटके कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नवाकोरा मराठी चित्रपट

Raja Rani: ‘राजाराणी’ची थरारक प्रेमकहाणी! हटके कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नवाकोरा मराठी चित्रपट

Jul 01, 2024 08:10 PM IST

Raja Rani Marathi Movie: थरारक प्रेमकहाणी घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजाराणी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

‘राजाराणी’ची थरारक प्रेमकहाणी!
‘राजाराणी’ची थरारक प्रेमकहाणी!

Raja Rani Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नवे प्रयोग होताना दिसत आहेत. एकीकडे काही रोमँटिक आणि अ‍ॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर, दुसरीकडे काही हॉरर आणि झोम्बीपट देखील मराठीत पाहायला मिळत आहेत. आता मात्र आणखी एक नवा प्रयोग होताना दिसणार आहे. यामध्ये एक प्रेमकथा तर पाहायला मिळणार आहे. मात्र, त्यासोबतच या प्रेमकथेत थरार देखील असणार आहे. थरारक प्रेमकहाणी घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राजाराणी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

ग्रामीण पार्श्वभूमीवरील थरारक प्रेमकहाणी असलेला ‘राजाराणी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर लालबागच्या राजाच्या चरणी सोमवारी लाँच करण्यात आलं असून, २० सप्टेंबर २०२४ पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.

OTT Releases: मराठी ओटीटीवर ‘झकास फ्रायडे'; प्रेक्षकांना पाहायला मिळणार देशी-विदेशी चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या..

पोस्टरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अनेक प्रेमकथा आजवर अनेक चित्रपटांतून दाखवल्या गेल्या आहेत. मात्र, प्रत्येक कथेचं काही ना काही वेगळेपण होतं. ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरवर आग लागलेल्या परिस्थितीत एक तरुण-तरुणी एकमेकांचा हात धरुन असल्याचं दिसतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात इतकं काय थरारक घडलं असेल, याची उत्सुकता या पोस्टरमुळे वाढली आहे. म्हणूनच एक थरारक प्रेमकहाणी अशी टॅगलाईन लिहिलेल्या या चित्रपटाची कथा रंजक असणार यात शंका नाही. त्यामुळे सकस कथा, उत्तम कलाकार असलेला ‘राजाराणी’ आता मोठ्या पडद्यावर येण्याची वाट पहावी लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.

WhatsApp channel