Aishwrya Rai First Movie : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच आपल्या कामाने आणि अभिनयाने लोकांची मने जिंकते. ऐश्वर्याच्या अभिनयाचे लोकांना वेड लागते असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अभिनेत्रीशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. यातील अनेक व्हिडिओंमध्ये ऐश्वर्या स्वत:शी संबंधित काही रंजक किस्से देखील सांगताना दिसते. पण तुम्हाला माहित आहे का की, ऐश्वर्याच्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातही पाहायला मिळणार होती. पण, आयत्यावेळी ऐश्वर्याने या चित्रपटाला नकार दिला होता. काय होतं कारण? चला जाणून घेऊया...
नुकताच कपिल शर्माच्या शोमधील ऐश्वर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने स्वतः सांगितले आहे की, ती 'राजा हिंदुस्तानी' चित्रपट करणार होती, पण काही कारणांमुळे ती तो करू शकली नाही. या व्हिडिओमध्ये कपिलने ऐश्वर्याला विचारले की, 'मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर तू बॉलिवूडमध्ये जाशील, असा विचार केला होता का?'
यावर ऐश्वर्या म्हणते की, 'नाही, मला माहीत आहे की आजकाल लोकांना वाटते की, त्यांनी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला तर त्यांच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडतात, पण तसे काही नसते. माझ्या बाबतीत असे नव्हते आणि माझी गोष्ट वेगळी आहे. मिस वर्ल्ड हे टायटल जिंकण्यापूर्वी मला चित्रपटाची संधी मिळाली होती.'
ऐश्वर्याने सांगितले की, 'कदाचित माझा पहिला चित्रपट 'राजा हिंदुस्तानी' असला असता, पण मी शेवटच्या क्षणी त्या चित्रपटाला नाही म्हटले होते आणि मी या स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार केला होता. त्यानंतर मी चित्रपटात जाईन असे कधीच वाटले नव्हते.' विशेष म्हणजे ऐश्वर्या राय आज इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या राय हिने हा चित्रपट नाकारल्यानंतर तो करिश्मा कपूरच्या हाती गेला.
याशिवाय ऐश्वर्या रायबद्दल बोलायचे झाले, तर ती तिच्या पर्सनल लाईफमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. होय, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या विभक्त होण्याच्या अफवा रोज समोर येतात आणि आगीसारख्या पसरू लागतात. मात्र, त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा नेहमीच खोट्या ठरतात. नुकताच या दोघांचा एकत्र व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
संबंधित बातम्या