Raja Gosavi Daughter: मराठी सृष्टीतील दिग्गज अभिनेते राजा गोसावी यांची ‘विनोदाचा राजा’ अशी ओळख होती. लाखाची गोष्ट, असला नवरा नको ग बाई, वाट चुकलेले नवरे यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये कारकीर्द गाजवत असताना मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. १९९८ मध्ये राजा गोसावी यांचे निधन झाले. पण तुम्हाला माहित आहे का कि राज गोसावी यांची लेक देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. होय हिंदी टेलिव्हिजन इंडस्त्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री शमा देशपांडे ही राजा गोसावी यांची लेक आहे.
राजा गोसावी दोन मुली व तीन मुलगे अशी अपत्य होती. मात्र त्यामध्ये धाकट्या मुलीने म्हणेजच शाम यांनी त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेला. शमा यांनी लहान वयातच वडील राजा गोसावी यांच्या नाटक कंपनीमध्ये रिप्लेसमेंट म्हणून लहान सहान भूमिका करायला सुरुवात केली होती. शमा यांचे वयाच्या १८व्या वर्षीच लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुली देखील झाल्या. मात्र पतीच अकाली निधन आणि मागोमाग वडिल सासू सासरे यांचा मृत्यू यासर्वांमुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या. घरगड चालवण्यासाठी शमा यांनी अभिनयाला गंभीरपणे घ्यायचं ठरवलं. पुढे त्यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली.
वाचा: प्रियकरासोबतचा वाद कोर्टापर्यंत गेला, आकस्मिक मृत्यू झाला! पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?
‘आशीर्वाद’, ‘घर एक मंदिर’, ‘कुटुंब’ अशा अनेक मालिकांमध्ये शमा यांनी काम केले. तसेच ‘लाल बादशाह’, ‘काहो ना प्यार है’, ‘बागी’ यासारख्या हिंदी चित्रपटातून शमा देशपांडे यांनी मोठ्या पडद्यावर काम केले. कुटुंब या हिंदी मालिकेत काम करत असताना त्यांची ओळख साई बल्लाळ यांच्याशी झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रूपांतरण प्रेमात झाले व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या